१. परकीय आक्रमकांना भारताचा आत्मा जिंकता न येणे आणि याविषयीचे सत्य ठाऊक नसल्याने विविध प्रश्नांना सामोरे जातांना हिंदू लाजिरवाणा होणे
‘जेव्हा एखादा हिंदु विदेशात जातो, तेव्हा त्याला विचारण्यात येते, ‘आता भारतावर कुणाचे राज्य आहे ? मुसलमानांचे कि ख्रिस्त्यांचे ?’ भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, हे प्रश्नकर्त्याला ठाऊकच नसते. भारत दीर्घकाळ पारतंत्र्यात होता. त्यामुळेच असे प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांनी हिंदु लाजिरवाणा होऊन गप्प बसतो. त्याचा देशाविषयीचा अभिमान न्यून होतो; कारण वेळोवेळी भारतावर परकीय आक्रमणे झाली, तर काहींनी राज्य केले; मात्र ते भारताचा आत्मा जिंकू शकले नाहीत, हे सत्य बिचाऱ्या हिंदूला ठाऊक नसते. त्याने खरा इतिहासच वाचलेला नसतो.
भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरी इतिहास मात्र मोगल अथवा ब्रिटीशधार्जिणाच लिहिला गेला. सर्वसामान्य हिंदूंच्या राष्ट्रप्रेमाला छेद जाईल, याच उद्देशाने तो लिहिला गेला आहे. त्यात आता काही पालट घडत आहेत, हे स्वागतार्ह आहे. सुदैवाने परकीय आक्रमणकर्त्यांनी भारतावर राज्य केले, तरी प्राचीन भारतीय संस्कृतीने जपलेला आत्मा मात्र ते जिंकू शकले नाहीत.
२. भारताने १ सहस्र ४०० वर्षे परकीय आक्रमणे झेलूनही भारताची ८० टक्के लोकसंख्या हिंदु असणे
परकीय आक्रमणकर्त्यांनी भारतावर अनेकदा आक्रमणे केली, देशाची संपत्ती लुटली; मात्र भारताची लढाऊ वृत्ती तशीच राहिली. उलट प्रसारमाध्यमांमुळेच अधिक हानी झाली. जवळपास १ सहस्र ४०० वर्षे भारताने परकीय आक्रमणे झेलूनही आज भारताची ८० टक्के लोकसंख्या हिंदु आहे. कित्येक सहस्रो वर्षे जुनी संस्कृती आणि धर्म अद्यापही जिवंत आहे. यातच सर्व काही आले.
३. चंद्रगुप्त मौर्य सम्राटाचे लढण्याचे सामर्थ्य पाहून अलेक्झांडरच्या सैन्याने लढण्यास नकार देणे आणि त्यानंतर १ सहस्र वर्षे कुठल्याही विदेशी आक्रमणकर्त्याने भारतावर आक्रमण न करणे
जगज्जेता म्हणवणाऱ्या अलेक्झांडर याने इसवी सन पूर्व ३२७ या वर्षी भारतावर प्रथम आक्रमण केले. प्रथम त्याने पंजाब प्रांताचा राजा पोरस याचा पराभव केला. त्याला गंगा नदीचा प्रदेश जिंकायचा होता. त्या वेळी चंद्रगुप्त मौर्य सम्राटाचा राजवंश भारतावर राज्य करत होता. त्याच्या सैन्याची संख्या आणि लढण्याची क्षमता बघून अलेक्झांडरच्या सैन्याधिकाऱ्यांनी बंड पुकारले. चंद्रगुप्त मौर्य सम्राटाच्या सैन्याशी लढण्यास त्यांनी नकार दर्शवला. त्यामुळे अलेक्झांडरला पंजाब राज्याच्या सीमेवरून परत जावे लागले. त्यानंतर १ सहस्र वर्षे कुठल्याही विदेशी आक्रमणकर्त्याचे भारतावर आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही.
४. पंजाब, सिंध प्रांतातील आणि राजपूत हिंदु राजांनी महंमद बिन कासिमची इस्लामची राजवट संपुष्टात आणणे
महंमद बिन कासिमच्या नेतृत्वाखाली परकीय सैन्याने सिंध प्रांतात इस्लामी राज्य स्थापन केले. त्याने ख्रिस्त वर्ष ७०८ ते ७११ पर्यंत राज्य केले; मात्र ७१५ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर पंजाब, सिंध प्रांतातील आणि राजपूत हिंदु राजांनी या इस्लामी राज्याची राजवट संपुष्टात आणली.
५. महंमद गझनी, अल्लाउद्दिन खिलजी, मोगल, बाबर आणि औरंगजेब यांचे राज्य
ख्रिस्ती वर्ष १००९ ते १०२६ या काळात महंमद गझनी याने भारतावर १७ आक्रमणे केली. या आक्रमणांचा उद्देश ‘भारतात असलेली अमाप संपत्ती लुटणे आणि इस्लामचा प्रसार करणे’, हा होता. चंदेला राज्याचा राजपूत राजा विद्याधर याने महंमद गझनीचा पराभव करून त्याची पुढील आक्रमणे रोखली. त्यानंतर काही वर्षांनी अल्लाउद्दिन खिलजी देहलीवर राज्य करू लागला. त्यानेच गुजरातमधील सोमनाथ मंदिर लुटले आणि मंदिरांचा विध्वंस केला. त्याचे राज्य १३०१ ते १३१६ पर्यंत चालले. शेवटी मोगल सैन्याने त्याचा पराभव करून मोगल राजवंशाचे राज्य स्थापन केले. अल्लाउद्दिन खिलजी याला गुजरात आणि राजस्थान येथील हिंदु राजांनी शेवटपर्यंत लढा दिला.
तैमूर खान आणि चंगेझ खान यांचा वारस बाबर हा ख्रिस्ती वर्ष १५२६ पासून मोगल साम्राज्याचा पहिला शासक होता. त्यानंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान आणि शेवटी औरंगजेब हे गादीवर आले. त्यांना राजस्थानच्या महाराणा प्रताप यांच्यापासून मराठ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कडव्या हिंदु फौजांशी शेवटपर्यंत लढा द्यावा लागला. मोगलांच्या शेवटच्या सम्राटाला ब्रिटिशांनी १८५७ या वर्षी पदच्युत केले. त्याआधी पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव करणारा अहमद शाह दुर्राणी हा पानिपतच्या युद्धानंतर भारतावर परत आक्रमण करू शकला नाही.
६. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांचे साम्राज्य !
वर्ष १६७४ मध्ये मराठी साम्राज्याचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहणापासून झाला. तो वर्ष १८१८ पर्यंत ब्रिटिशांनी दुसरा बाजीराव यांचा पराभव करेपर्यंत टिकला. या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ मुसलमान पातशाह्या पराभूत केल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी झालेल्या प्रत्येक लढाईत विजय मिळवला. पेशव्यांनी पानिपतच्या युद्धात पराभव स्वीकारल्यानंतरही मराठी साम्राज्य दक्षिणेत तंजावूर, पूर्वेला ओडिशा आणि पश्चिमेला अफगाणिस्तानातील अटकेपर्यंत वाढवत नेले.
७. भारतीय क्रांतीकारकांचे योगदान
शेवटी भारतीय क्रांतीकारक, ब्रिटीश सैन्यातील सैनिकांचे बंड, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना आणि सर्वसाधारण जनतेचा रेटा यांमुळे ब्रिटिशांना भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य देणे भाग पडले.
८. इस्लामी राज्ये आणि हिंदू
या आधी परकीय आक्रमणकर्त्यांनी जगातील ज्या ज्या देशांत आक्रमणे केली, त्या सर्व देशांना इस्लामी राज्य बनवून तेथे मुसलमानांना बहुसंख्य बनवले. त्यात बॅबिलोन देशाला इराक, मिसोपोटेमिया देशाला तुर्कस्तान, पर्शिया देशाला इराण बनवून तेथील संस्कृती, आनंद आणि धर्म यांना नष्ट केले. आशिया खंडातील इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये हिंदू राज्य करत होते; पण आता हे देश इस्लामी झाले आहेत. चीन, जपान, श्रीलंका यांसारखे देश बौद्ध झाले आहेत; मात्र भारताने एवढी वर्षे पारतंत्र्यात काढूनही हिंदूंची लोकसंख्या ८० टक्क्यांपर्यंत राखली आहे. भारत आणि नेपाळ हे दोन देश सोडले, तर हिंदू बहुसंख्यांक असलेले इतर कुठलेही राष्ट्र शेष नाही. याला कारण हिंदूंची लढाऊ वृत्ती हे आहे. याविषयी हिंदूही अभिमानाने सांगू शकतात.
– श्री. शिरीष देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (६.३.२०२२)
संपादकीय भूमिकाहिंदूंनी स्वतःतील लढाऊ वृत्ती जाणून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी ! |