अमरावती येथील होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

अमरावती येथील होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर यांनी माझी तपासणी केली. तेव्हा त्यांची पुढील गुणवैशिष्ट्ये मला जाणवली.

होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर

१. मनाला प्रसन्नता जाणवणे

श्री. ठोसर यांच्या माध्यमातून चांगली शक्ती कार्यरत झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांना पाहिल्यावर किंवा त्यांच्या सहवासात असतांना मनाला प्रसन्न वाटले.

२. होमिओपॅथी वैद्य ठोसर यांना तत्त्वाकडून आतून मार्गदर्शन झाल्यामुळे त्यांचे निदान अचूक होऊन रुग्णांना योग्य उपचार मिळणे

‘त्यांचे तत्त्वाशी अनुसंधान असल्यामुळे त्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तत्त्व आतून मार्गदर्शन करते’, असे जाणवले. त्यामुळे त्यांचे निदान अचूक होऊन रुग्णांना योग्य उपचार मिळतात. त्यामुळे रुग्णांची व्याधी अल्पावधीत बरी होते.

कु. मधुरा भोसले

३. होमिओपॅथी वैद्य ठोसर यांना उपचारांचे तात्त्विक आणि प्रायोगिक अशा दोन्ही स्तरांवरील ज्ञान असणे

होमिओपॅथी वैद्य ठोसर यांचा अहं अल्प असून त्यांच्यामध्ये शिकण्याची वृत्ती आहे. त्यामुळे ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि त्यामुळे उद्भवणारे विविध विकार यांचा बारकाईने अभ्यास करतात. त्यामुळे प्रतिदिन त्यांच्या ज्ञानात भर पडते. अशा प्रकारे होमिओपॅथी वैद्य ठोसर यांना उपचारांचे तात्त्विक आणि प्रायोगिक अशा दोन्ही स्तरांवरील ज्ञान आहे.

४.  होमिओपॅथी वैद्य ठोसर यांचे औषधोपचार त्वरित लागू होणे

होमिओपॅथी वैद्य ठोसर यांचा आयुर्वेदाचा सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांना रुग्णाच्या ‘वात, पित्त आणि कफ’ या प्रकृतीमुळे उद्भवणाऱ्या विविध विकारांचे सविस्तर ज्ञान आहे. त्यामुळे त्यांचे औषधोपचार सात्त्विक असून त्यांनी सांगितलेले पथ्य नैसर्गिक स्वरूपाचे असून ते रुग्णाच्या प्रकृतीला अनुकूल असल्यामुळे त्वरित लागू होतात.

५. होमिओपॅथी वैद्य ठोसर यांच्या औषधोपचारांमुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर उपाय होणे

होमिओपॅथी वैद्य ठोसर यांच्या देहाभोवती श्रीदुर्गादेवीच्या मारक शक्तीचे वलय आहे आणि त्यांच्यावरील श्रीगुरुकृपेमुळे त्यांच्याभोवती चैतन्यमय पिवळ्या रंगाची आभा कार्यरत आहे. त्यामुळे होमिओपॅथी वैद्य ठोसर यांचे अनिष्ट शक्तीच्या आक्रमणांपासून रक्षण होते. त्यामुळे होमिओपॅथी वैद्य ठोसर यांच्या औषधोपचारांमध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विक शक्ती आणि चैतन्य कार्यरत झालेले असते. त्यामुळे रुग्णावर केवळ शारीरिक किंवा मानसिक स्तरांवर उपाय न होता आध्यात्मिक स्तरावरही लाभ होऊन रुग्णाला बरे वाटते.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२२)