६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे प्रभाकर पिंगळेआजोबा यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेतांना आणि अंत्यविधीच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे !

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे प्रभाकर पिंगळेआजोबा (वय ८६ वर्षे) यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेतांना आणि अंत्यविधीच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे !

३०.९.२०२१ या दिवशी प्रभाकर पिंगळेआजोबांचे निधन झाल्यावर त्यांचे अंत्यदर्शन घेतांना आणि दुसर्‍या दिवशी त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अश्‍विनी कुलकर्णी

१. आजोबांचे अंत्यदर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे

अ. ‘आजोबांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज जाणवत होते.

आ. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘ते शांतपणे झोपले आहेत’, असे मला वाटत होते.

इ. त्यांचे पार्थिव ठेवलेल्या कक्षात मला कसलाही दाब न जाणवता हलकेपणा जाणवला.’ (३०.९.२०२१)

२. आजोबांचे अंत्यविधी होण्यापूर्वी आणि ते चालू असतांना जाणवलेली सूत्रे

‘पिंगळेआजोबांचे नातेवाईक अन्य गावाहून येणार असल्याने त्यांच्यावर दुसर्‍या दिवशी, म्हणजे १.१०.२०२१ या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी आजोबांच्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

अ. आजोबांच्या देहात पुष्कळ चैतन्य असल्याचे मला जाणवत होते.

आ. आजोबांचे वय ८६ वर्षे होते, तरीही त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांचे वय त्याहून अल्प आहे’, असे मला वाटत होते.

इ. ‘ते श्वासोच्छ्वास करत असून त्यांची छाती हालत आहे आणि ते कोणत्याही क्षणी उठून बोलू लागतील’, असे मला वाटत होते.

ई. ‘आजोबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर ‘त्यांचा कृतज्ञताभाव आणि ईश्वरप्राप्तीची व्याकुळता दाटून आली आहे’, असे जाणवत होते.

उ. अंत्यसंस्कारापूर्वीचे विधी चालू असतांना त्यांचा देह अधिक तेजस्वी दिसू लागला.

ऊ. त्यांच्या पायांच्या नखांचा रंग पिवळा दिसत होता.

‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेने जाणवलेली ही सूत्रे आपल्या चरणी कृतज्ञतेने अर्पण करते.’

– अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक