श्री भवानीदेवीने मस्तकावरून हात फिरवल्याचे जाणवणे आणि त्यानंतर मन शांत होणे

श्री भवानीदेवी

‘२४.१२.२०२० या दिवशी मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. त्यामुळे माझा मानसिक त्रास असह्य होऊन मला मानसिक आधाराची आवश्यकता वाटत होती; म्हणून मी रामनाथी, गोवा येथील आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीसमोर गेले. तिथे गेल्यावर आईच्या कुशीत गेल्यावर जसे रडू येते, तसे मला रडू आले. काही वेळाने ‘देवीने माझ्या डोक्यावरून हात फिरवला’, असे मला सूक्ष्मातून जाणवले. देवीचा तो स्पर्श अनुभवतांना माझे रडणे थांबले आणि माझे मन पुष्कळ शांत झाले. मी मूळची तुळजापूर येथील आहे. मी लहानपणापासून श्री भवानीदेवीशी सूक्ष्मातून बोलते. त्या वेळी ‘माझी खरी आई श्री भवानीदेवीच आहे’, याची मला जाणीव झाली. त्यासाठी मी तिच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक