वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे प.पू. दास महाराजांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला कुठल्याही कारणाविना जखम होऊन त्यातून रक्त येणे आणि या घटनेचे आध्यात्मिक विश्लेषण

श्री. राम होनप

१. प.पू. दास महाराजांनी केलेल्या प्रार्थनेने यागात वाढलेला आध्यात्मिक त्रास दूर होणे आणि वाईट शक्ती प.पू. दास महारांजावर आक्रमण करणार असल्याचे साधकाला जाणवणे

‘वर्ष २०१९ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक याग झाला. यागाच्या सूक्ष्म परीक्षणाची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. यागाच्या वेळी वाईट शक्तींमुळे वातावरणात पुष्कळ दाब निर्माण झाला होता. वाईट शक्तींनी यागाच्या भोवती पांढर्‍या रंगाची गोल आकारात अनेक कवचे निर्माण केली होती. त्यामुळे यागाचा परिणाम वातावरणावर होण्यात अडचण येत होती. ‘वाईट शक्तींमुळे यागाचा श्वास कोंडला आहे’, असे जाणवत होते.

हे सूत्र मी तेथे उपस्थित असलेल्या प.पू. दास महाराज यांना सांगितले. त्यांनाही असेच जाणवत होते. प.पू. दास महाराज लगेच उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या गुरूंना, म्हणजेच प.पू. श्रीधरस्वामींना ‘हा त्रास दूर व्हावा’, यासाठी आर्ततेने आणि तळमळीने प्रार्थना केली. या प्रार्थनेने वाईट शक्तींनी यज्ञाभोवती केलेले कवच नष्ट झाल्याचे दृश्य मला दिसले. त्या वेळी ‘वाईट शक्तींचे नियोजन प.पू. दास महाराज यांच्यामुळे फसल्याने वाईट शक्ती त्यांच्यावर आक्रमण करणार आहेत’, असे मला जाणवले.

२. प.पू. दास महाराज यांना भेटण्याविषयी साधकाच्या मनात परत परत विचार येणे आणि तेव्हा त्यांच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण झाल्याचे समजणे

दुसर्‍या रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी मी रहात असलेल्या खोलीतून सेवेला जाण्यासाठी निघालो. अचानक माझ्या मनात, ‘जातांना प.पू. दास महाराज यांना भेटून जावे’, असा विचार आला; परंतु सेवेला उशीर होत असल्याने मी जाण्याचे टाळले. त्यानंतर परत परत हा विचार माझ्या मनात येऊ लागल्याने मी प.पू. दास महाराज यांच्या खोलीत गेलो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘रात्री आठ वाजता मी फेरी मारून खोलीत आलो, तर माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला कुठल्याही कारणाविना जखम झाली आणि त्यातून बरेच रक्त वाहू लागले.’’ तेव्हा मला ‘प.पू. दास महाराज यांना भेटायला जाण्याचा विचार मनात परत परत का येत होता ?’, याचे उत्तर मिळाले, तसेच ‘यज्ञाच्या वेळी वाईट शक्ती प.पू. दास महाराज यांच्यावर आक्रमण करणार असल्याचा माझ्या मनात आलेला विचार ही पूर्वसूचना होती’, हे लक्षात आले.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक