प.पू. दास महाराज यांची सेवा करतांना श्री. अनिकेत जमदाडे यांना आलेल्या अनुभूती

‘मी गेल्या दीड वर्षापासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. या कालावधीत मला प.पू. दास महाराज यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प.पू. दास महाराज

१. प.पू. दास महाराज यांना अंघोळ घालतांना दैवी सुगंध येणे : प.पू. दास महाराज यांना (प.पू. बाबांना) अंघोळ घालतांना किंवा त्यांना कपडे घालतांना ते माझ्या डोक्यावर हात ठेवतात. तेव्हा मला वाटते, ‘देवानेच माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे.’ त्यांना अंघोळ घालतांना कधी कधी मला पुष्कळ दैवी सुगंध येतो.

श्री. अनिकेत जमदाडे

२. रात्री प.पू. बाबांना ‘क्रेप बँडेज’ न बांधता झोपल्यावर ‘प.पू. बाबा बोलावत आहेत’, असे सूक्ष्मातून जाणवणे : प.पू. बाबांचे पाय दुखत असल्याने त्यांच्या पायांना आधार म्हणून मी नेहमी रात्री त्यांना ‘क्रेप बँडेज’ (Crepe bandage) बांधायला जातो. एकदा रात्री मी त्यांना ‘क्रेप बँडेज’ न बांधताच झोपलो. तेव्हा साधकांनी मला भ्रमणभाष करण्याचा प्रयत्न केला; पण भ्रमणभाषच्या अडचणीमुळे त्यांचा माझ्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा मी झोपेत असतांना ‘प.पू. बाबा मला बोलावत आहेत’, असे मला वाटले. मी उठून त्यांच्या खोलीच्या दारात पोचलो आणि त्याचवेळी मला प.पू. बाबांचा भ्रमणभाष आला अन् त्यांनी विचारले, ‘‘अरे, येतोस ना ?’’ तेव्हा ‘बाबांनी मला सूक्ष्मातून हाक मारून तेथे येण्याची प्रेरणा दिली’, हे माझ्या लक्षात आले.’

– श्री. अनिकेत जमदाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक