परात्पर गुरुदेवांनी चैतन्यमय अशा सनातनच्या आश्रमातून निर्माण होणारी वैश्विक ऊर्जा ब्रह्मांडात विलीन होण्याची प्रक्रिया दाखवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मी ध्यानमंदिरामध्ये नामजप करत होतो. त्या वेळी एक साधिका ध्यानमंदिरात उदबत्ती लावून देवतांना ओवाळून ध्यानमंदिराची शुद्धी करत होती. उदबत्तीतून निर्माण होणारा धूर ऊर्ध्व दिशेने जात असतांना तो ‘ॐ’चा आकार धारण करून वातावरणात विलीन होत होता. ‘सनातनच्या आश्रमात निर्माण झालेली वैश्विक ऊर्जा ब्रह्मांडात कशा स्वरूपात विलीन होते ?’, हे या प्रक्रियेतून देव मला दाखवून देत होता. प्रत्येक साधकाच्या नामजपातून असो वा संत आणि देवता यांच्या अस्तित्वाने असो, आश्रमातील प्रत्येक घटनेतून अन् कृतीतून निर्माण झालेले चैतन्य ब्रह्मांडात विलीन होते.

श्री. अविनाश जाधव

‘श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे सनातनचे आश्रम ही ‘आध्यात्मिक शक्ती केंद्रे’ कशा स्वरूपात आहेत ?’, याची जाणीव देवाने या वेळी मला प्रकर्षाने करून दिली. श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेल्या चैतन्याचा स्रोत असलेल्या आणि देवत्व निर्माण झालेल्या या आश्रमांत आम्हा सर्व साधकांना रहाण्याची संधी मिळते. याच आश्रमांत आम्हा साधकांच्या स्वभावदोषांमुळे निर्माण झालेली आमची नकारात्मकता विरून जाते आणि सकारात्मकतेने मन भरून जाते. ‘श्रीमन्नारायणस्वरूप असणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या संकल्पानेच ‘सनातनचे चैतन्यमय आश्रम पुढील शेकडो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करणार आहेत’, हे त्यांचे बोल कसे सत्यात उतरत आहेत ?’, याची प्रचीती देवाने मला दिली. यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या प्रती कोटीश: कृतज्ञ आहे. ‘देवा, पदोपदी तू आमच्या समवेत आहेस’, हेच यातून या मनाला भावते.’

– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.३.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक