महर्षींनी रामनाथी आश्रमात अनेक यज्ञ करण्यास सांगण्यामागील कारण जाणण्याची जिज्ञासा जागृत होणे

‘महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात अनेक यज्ञ होत आहेत. ‘कर्मकांडाशी निगडित यज्ञ करायला सांगण्यामागे काय कारण असावे ?’, अशी जिज्ञासा माझ्या मनात जागृत झाली. तेव्हा देवाकडून विचार आला, ‘जे ब्रह्मांडात आहे, ते पिंडातही आहे. ज्याप्रमाणे मनुष्याचे शरीर चालण्यासाठी भोजनाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे धर्मकार्यातील विघ्ने दूर होऊन साधकरूपी समाजपुरुषाला देवतांचे सामर्थ्य मिळवून देण्यासाठी यज्ञाच्या माध्यमातून देवांना हविर्भाग देणे आवश्यक आहे.’

– श्री. आनंद जाखोटिया, इंदूर, मध्यप्रदेश. (४.६.२०२०)