एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार !

‘मानवाचा जन्म का झाला ? जन्मापूर्वी तो कुठे होता ? मृत्यूनंतर तो कुठे जातो ? इत्यादी विषयांची थोडीफारही माहिती नसणारे पाश्‍चात्त्य आणि साम्यवादी मानवजातीचे प्रश्‍न कधी सोडवू शकतील का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरेच नव्हे, तर त्यांतील अशुभ कसे टाळायचे, हे ज्ञात असलेला एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिकण्याच्या वृत्तीचा लाभ !

‘नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. त्यामुळे आपल्याला इतरांचे दृष्टीकोनही कळतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्म आणि पाश्‍चात्त्य विचारसरणी !

‘हिंदु धर्म मन मारायला, नष्ट करायला, मनोलय करायला शिकवतो, तर पाश्‍चात्त्य विचारसरणी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी करायला शिकवते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताच्या दु:स्थितीचे एक कारण म्हणजे, राज्यकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवणे !

‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या सर्व राज्यकर्त्यांनी केवळ बौद्धिक शिक्षणाच्या माध्यमातून वैद्य, अभियंते, वकील तयार केले; पण यांना साधना शिकवून ‘संत’ होण्याचे शिक्षण दिले नाही. याचमुळे आज देशद्रोहापासून लाचखोरीपर्यंत सर्व प्रकारच्या समस्यांनी हा देश व्यापलेला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्मप्रसार करतांना पुढील गोष्ट लक्षात ठेवा !

‘देवाचे अस्तित्वच न मानणारे कधी ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा विचार करू शकतील का ? साधकांनी अध्यात्मप्रसार करतांना अशांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नये !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना न करणारे पशूतुल्य !

‘साधना न करणारे मानव प्राण्यांप्रमाणे आहेत. प्राण्यांना शरीर असूनही ते साधना करत नाहीत, तसेच बहुसंख्य मानव शरीर असूनही साधना करत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भक्तीयोगाचे मह‌त्त्व !

‘ज्ञानयोगानुसार साधना केल्यास ती प्रामुख्याने बुद्धीने होते. कर्मयोगानुसार साधना केल्यास ती शरीर आणि बुद्धी यांनी होते, तर भक्तीयोगानुसार साधना केल्याने ती मन, बुद्धी आणि शरीर यांद्वारे होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरूंचे महत्त्व !

‘आपल्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी लहानपणी मुलांना अ, आ, इ… हे शिकवले नसते, तर मुलांना पुढे शिकता आले नसते. त्याप्रमाणे अध्यात्मात गुरु आपल्याला जे शिकवतात, ते पुढे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आधुनिक विज्ञानापेक्षा श्रेष्ठ हिंदु धर्मग्रंथ !

हल्ली विज्ञानाने जे शोध लावले, त्यांचा शोध आपल्या ऋषी-मुनींनी सहस्रो वर्षांपूर्वीच लावला होता. त्यांचा उल्लेख वेद, उपनिषदे, पुराणे यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये केलेला आहे. या ग्रंथांमध्ये अजूनही अनेक वैज्ञानिक सूत्रे सांगितलेली आहेत, की ज्यांच्यापर्यंत आधुनिक विज्ञानाला पोचता आलेले नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद !

विज्ञानाने स्वार्थीपणा वाढू शकतो, तर अध्यात्मात साधनेने स्वार्थीपणा नाहीसा होतो – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले