‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’विषयी योग्य दृष्टीकोन !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही (आध्यात्मिक) प्रगती होते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक सर्वच नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेसंदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुढील पिढ्यांवर तामसिक संस्कार होण्यामागील कारण !

‘सात्त्विक चित्रकार देवतेची सात्त्विक चित्रे काढतात. याउलट एम्.एफ्. हुसेनसारखे तामसिक चित्रकार देवतेची नग्न, तामसिक चित्रे काढतात. यात आश्चर्य एवढेच की, मृतवत हिंदूंनी त्यासंदर्भात वर्षानुवर्षे काही केले नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांवरती तसे संस्कार झाले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारणी आणि संत यांच्यातील मूलभूत भेद !

‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ʻविचारस्‍वातंत्र्यʼ म्हणजे काय नाही, हे लक्षात घ्या !

‘विचारस्‍वातंत्र्य म्‍हणजे दुसर्‍याला दुखवायचे किंवा धर्माच्‍या विरुद्ध बोलायचे स्‍वातंत्र्य नाही’, हेही स्‍वातंत्र्यापासून गेली ७६ वर्षे भारतावर राज्‍य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाच्‍या लक्षात आले नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकीला उभ्या रहाणाऱ्या उमेदवारांची मानसिकता !

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कुणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान अन्‌ पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अध्यात्माविषयी हास्यास्पद अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवादी हे वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी बौद्धिक स्तराच्या विषयांवर आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंते इत्यादींशी वाद घालत नाहीत; मात्र बुद्धीच्या पलीकडील आणि स्वतःला शून्य ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयी स्वतः सर्वज्ञ असल्याप्रमाणे संतांवर टीका करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भक्तीचे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले