बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अध्यात्माविषयी हास्यास्पद अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवादी हे वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी बौद्धिक स्तराच्या विषयांवर आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंते इत्यादींशी वाद घालत नाहीत; मात्र बुद्धीच्या पलीकडील आणि स्वतःला शून्य ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयी स्वतः सर्वज्ञ असल्याप्रमाणे संतांवर टीका करतात.’

संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेकजण साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’

परिपूर्ण सेवेचे महत्त्व !

‘सेवा केल्यास त्याचा ३० टक्के लाभ होतो. सेवा चांगली केली, तर ५० टक्के आणि परिपूर्ण केली, तर १०० टक्के लाभ होतो.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला अधिक महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्‍वरी राज्यातील जनता कशी असेल ?

‘ईश्‍वरी राज्यातील जनता त्या त्या सणाला अनुरूप अशी साधना करील. सुट्टी मिळाली म्हणून मजा करायला जाणार नाही.’

शिक्षणात माणुसकी न शिकवल्याचा परिणाम !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरदार निर्माण झाले आहेत.’

हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’

यज्ञाचे महत्व !

‘मनुष्याच्या शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अमृत आणि विष

अमृत प्यायलेल्यालासुद्धा ‘जहर’ म्हणजे विष घेतले, तर ‘आपण मरू कि काय’, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.