रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेले सवत्स गोमातापूजन आणि नंदीपूजन या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

१. गोपूजन चालू असतांना गोमातेविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्या वेळी आलेली अनुभूती

अ. ‘पुरोहित मंत्रपठण करत असतांना गोमाता मंत्र ऐकत आहे’, असे मला जाणवले.

आ. गोमाता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे भावपूर्ण दृष्टीने पहात एका जागेवर उभी होती.

इ. गोमातेच्या कपाळावर असलेला व्रण त्रिशुळासारखा दिसत होता.

ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गोमातेला प्रदक्षिणा घालत असतांना गोमाता त्यांच्याकडे पहात होती.

उ. श्रीकृष्णाचा श्‍लोक म्हणत असतांना ‘दोन्ही कान टवकारून ती श्‍लोक ऐकत आहे’, असे मला वाटले.

ऊ. हे सर्व पहातांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. ही अनुभूती लिहितांनाही माझी भावजागृती होत होती.

२. नंदीपूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

२ अ. पितरांना गती मिळण्यासाठी प्रार्थना करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या पितरांना गती मिळण्यासाठी प्रार्थना करत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे : नंदीपूजन आणि पितरपूजन या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी पितरांना गती मिळण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. तेव्हा मी प्रार्थना करत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या पितरांना गती मिळण्यासाठी प्रार्थना करत आहेत’, असे मला दिसले.

२ आ. त्यानंतर मला माझे वडील दिसले. ते आनंदी दिसत होते. नंतर पुन्हा मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर दिसले. तेव्हा माझी भावजागृती झाली.

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी या अनुभूती दिल्या’, याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सुरेश काशेट्टीवार (वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक