सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातनच्या सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांच्या प्रगतीच्या संदर्भात त्यांच्या कन्या सुश्री (कु.) राजश्री सखदेव यांना केलेले मार्गदर्शन

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

आज १९.८.२०२४ या दिवशी सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांच्या ८ व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !

सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी

सुश्री (कु.) राजश्री सखदेव : २१ जुलै २०२४ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. सकाळी माझे आवरून झाल्यावर मी आपण (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर), श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि माझी आई सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांची मानसपूजा करत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे चेहरे मला स्पष्टपणे आणि बराच वेळ दिसले; पण आईचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आणतांना केवळ एखादा सेकंद किंवा त्यापेक्षाही अल्प वेळ दिसला आणि लगेच तिच्या जागी आपणच (परात्पर गुरु डॉक्टर) दिसू लागलात. वर्ष २०१६ मध्ये आईने देहत्याग केल्यानंतर ज्या ज्या वेळी मी तिचा चेहरा डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करते, त्या वेळी तिच्या जागी मला आपलेच (परात्पर गुरु डॉक्टरांचे) दर्शन होते. आताही तसेच झालेले पाहून माझ्या मनात प्रश्न आला, ‘आईच्या जागी परात्पर गुरु डॉक्टर दिसतात, तर मी आईला प्रार्थना करणे योग्य आहे कि मी आपल्यालाच (प.पू. डॉक्टरांनाच) प्रार्थना करायला हवी ?

सुश्री (कु.) राजश्री सखदेव

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्ही आईलाच प्रार्थना करा आणि ‘तिची आणखी काय प्रगती होते’, ते पहा. ‘अशी अनुभूती येणे’, हे आईच्या प्रगतीचे लक्षण आहे.

सुश्री (कु.) राजश्री सखदेव : एरव्हीही मला आईची आठवण अल्प वेळेला येते; पण जेव्हा ती येते, तेव्हा त्यातून मला साधनेसाठी स्फुरण मिळते. एखादा प्रसंग किंवा तिने सांगितलेली एखादी गोष्ट आठवते आणि त्या वेळी ‘मला ते आवश्यक असते’, हे लक्षात येते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जितके आवश्यक आहे, ते सर्व देव करतो. आईची आठवण येणे आवश्यक आहे; कारण ती साधनेत पुष्कळ पुढे गेलेली आहे. जे होईल, ते साक्षीभावाने पहात रहा.

– सुश्री (कु.) राजश्री सखदेव (सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांची कन्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.८.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]