गुरूंवर अढळ श्रद्धा असली पाहिजे !

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली पाहिजे !

‘सत्य असते, तेच चिरंतन रहाते. धर्मशास्त्रातील सिद्धांत युगानुयुगे तसेच आहेत. त्यांत कोणी पालट करू शकलेला नाही. याउलट विज्ञानातील सिद्धांत काही वर्षांतच पालटतात; कारण विज्ञान अंतिम सत्य सांगू शकत नाही. तात्पर्य विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली, तरच ते सत्य समजले पाहिजे, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांची दु:स्थिती !

‘राजकीय पक्षांतील व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार न करता केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा विचार करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गलिच्छ राजकारणावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

‘हल्लीचे बहुतेक ठिकाणचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ! हे सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यास पर्याय नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ʻसर्वधर्मसमभाव’ हा शब्द अडाणीच बोलतात !

‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द विविध धर्मांचा अभ्यास नसलेले अडाणीच बोलतात. तसे बोलणे म्हणजे ‘सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे ज्योतिषशास्त्र !

‘कुठे भविष्यात काय होणार, याचे एकाही व्यक्तीच्या संदर्भात सर्व तपासण्या करूनही सांगता न येणारे आणि निसर्गाच्या संदर्भात केवळ ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे केवळ निसर्गाचेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीचे भविष्य जन्मकुंडली आणि नाडीपट्ट्या अन् संहिता यांच्या आधारे सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी,सर्वधर्मसमभावी,साम्यवादी यांच्यामुळेच देश आणि धर्म यांची स्थिती दयनीय !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली . सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साम्यवाद हा शब्द पुढे पृथ्वीवरून नाहीसा होण्याचे कारण

‘साम्यवाद’ या शब्दाला अनुसरून कुठेही ‘साम्य का नसते ?’, यासंदर्भातही साम्यवाद्यांना जिज्ञासा नसते; म्हणून मुळातील कारणे, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास, साधना इत्यादी त्यांना कळत नाही. त्यामुळे ही कारणे दूर करण्यास ते साहाय्य कसे करू शकतील ? म्हणूनच लवकरच ‘साम्यवाद’ हा शब्द पृथ्वीवरून नाहीसा होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हत्या, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळेत, महाविद्यालयात आणि समाजात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत एका तरी सरकारने शिक्षण दिले का ? न दिल्यामुळे कोट्यवधी गुन्हे झाले आहेत आणि होतही आहेत. यावरचा एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले