हल्लीच्या काळात ‘जशी प्रजा, तसा राजा’ !

‘यथा राजा तथा प्रजा ।, म्हणजे ‘जसा राजा, तशी प्रजा’, उदा. रामराज्यात रामाप्रमाणे सर्व प्रजा सात्त्विक होती. आता ‘यथा प्रजा तथा राजा ।’, म्हणजे ‘जशी प्रजा, तसा राजा’, अशी स्थिती झाली आहे, म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या प्रजेने निवडून दिलेले शासनकर्ते तसेच आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नित्य असा धर्म आणि सारखा पालटणारा बुद्धीप्रामाण्यवाद !

‘धर्मात चिरंतन सत्य सांगितलेले असल्यामुळे पुढच्या पिढीमुळे आधीची पिढी मूर्ख ठरत नाही. याउलट बुद्धीची कक्षा जशी रूंदावत जाते, तसे आधीच्या पिढीतील बुद्धीवान ‘मूर्ख’ किंवा ‘सनातनी’ समजले जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी हे देशद्रोहीच !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी देशद्रोहीच होत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गाढवाला गुळाची चव काय ?

‘हिंदु धर्माच्या विरोधात साहित्यिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी बडबडतात. तेव्हा ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, या म्हणीची आठवण येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यथा प्रजा तथा लोकप्रतिनिधी !

‘पूर्वीच्या काळी होते, ‘यथा राजा तथा प्रजा’, म्हणजे ‘जसा राजा, तशी प्रजा.’ आता आहे, ‘यथा प्रजा तथा लोकप्रतिनिधी !’, म्हणजे जशी रज-तमप्रधान प्रजा, तसे लोकप्रतिनिधी !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

असे लोकप्रतिनिधी देशाचे काय भले करणार ?

‘संस्कृतमध्ये ‘समानशीले व्यसनेषु सख्यम् ।’, म्हणजे, ‘समान गुणदोष असतांना, तसेच संकटाच्या वेळी एकमेकांची मैत्री होते’ असे एक सुभाषित आहे. या सिद्धांतानुसार जनता रज-तमप्रधान असल्याने निवडणुकीत निवडून येणारे जनतेचे प्रतिनिधी तसेच असतात ! ते देशाचे काय भले करणार ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उथळ विचारांचे अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्‍यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

‘कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वभाषाप्रेम नष्ट करणार्‍या शासनकर्त्यांना देव क्षमा करणार नाही !

स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे. शासनकर्त्यांच्या या राष्ट्रीय पातकाला देव क्षमा करणार नाही. भावी हिंदु राष्ट्रात ‘स्वभाषाभिमान बाळगणे’, हा धर्मच असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘बुद्धीप्रामाण्यवादी आणि जात्यंध यांच्यामुळे हिंदूंची झालेली अतोनात हानी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडाली. जात्यंधांमुळे हिंदूंची आपसात फूट झाली. त्यामुळे भारतात बहुसंख्य असूनही ते इतर धर्मियांकडून आणि नक्षलवाद्यांकडून मार खात आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले