(म्हणे) ‘आम्ही भारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या चाचणीची हेरगिरी केली नाही !’

चीन आणि पाक यांंच्यावर वचक बसवण्यासाठी अमेरिकेचे साहाय्य घेण्याचा विचार करतांना अमेरिकेच्या या मानसिकतेविषयी भारताने सावध रहाणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! जशी अमेरिका भारतात हेरगिरी करते, त्याप्रमाणे भारत अमेरिकेची हेरगिरी करतो का ?

राष्ट्रहितासाठीही एक होऊ न शकणारे राजकारणी ‘सुराज्य’ कसे आणणार ?

स्वातंत्र्योत्तर काळात राजकारण्यांनी ‘सत्ता’ हेच ध्येय समोर ठेवले असल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचेच, अगदी राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्राची सुरक्षा आदींशी निगडित गोष्टींचेही राजकारण करतात. त्यामुळे ते धर्महितासाठी तर नाहीच; पण राष्ट्रहितासाठीही एकवटून लढू शकत नाहीत !

व्हॅटिकनमध्ये नवीन लैंगिक शोषणविरोधी कायदा कार्यान्वित करणार

लैंगिक शोषणाच्या वाढत्या तक्रारींनी ‘व्यथित’ झालेल्या पोप फ्रान्सिस यांनी उचलले पाऊल ! व्हॅटिकनला उशिरा सुचलेले शहाणपण ! या कायद्याची कार्यवाही करून पाद्रयांकडून होणारे लैंगिक शोषण थांबले जाईल, याची निश्‍चिती कोण देणार ?

काश्मीरमध्ये पुन्हा सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जात असतांना चारचाकीमध्ये स्फोट

पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाला दीड मास लोटल्यानंतर आता तशाच प्रकारची घटना परत घडली आहे. जर हे आतंकवादी आक्रमण असेल, तर पुलवामा येथील आक्रमणातून सुरक्षायंत्रणांनी काय धडा घेतला, हा प्रश्‍नच आहे !

दृष्टीहीन असूनही भोळ्या भावाच्या आधारे पू. (सौ.) संगीता पाटील झाल्या सनातनच्या ८५ व्या संत !

येथे ३० मार्च या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात भोसरी येथील सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या. त्या सनातनच्या ८५ व्या संत झाल्या आहेत.

केरळमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचे कारण सांगत ख्रिस्ती संघटनेकडून ‘ल्युसिफर’ या मल्ल्याळी चित्रपटाला विरोध

अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ल्युसिफर’ हा मल्ल्याळी चित्रपट २८ मार्च या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ‘ख्रिश्‍चन डेमोक्रेटिक मुव्हमेंट ऑफ केरला’ या ख्रिस्ती संघटनेने विरोध केला आहे.

‘राजकीय किंवा धार्मिक कारणेच आहेत’, या अंधश्रद्धेतून बाहेर येऊन दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण करा ! – उद्धव ठाकरे

अनेकदा आरोपी घरातच दडलेले असतात आणि तेच आरोपी पोलीस आणि न्यायालय यांच्यावर आगपाखड करून अन्वेषण यंत्रणांची दिशाभूल करतात. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अन्वेषण यंत्रणा आणि सरकार यांच्यावर संशय घेणार्‍या याचिकाकर्त्यांच्या हेतूविषयी शंका घेण्यास वाव आहे.

पाकला बालाकोटमध्ये झालेली हानी बघायचीच नाही ! – वायूदल प्रमुख  बी.एस्. धनोआ

भारताच्या वायूदलाने पाकमधील जैश-ए-महंमदच्या बालाकोटमधील आतंकवादी प्रशिक्षण तळावर केलेल्या आक्रमणामध्ये कोणतीही हानी झालेली नाही, असे पाकिस्तान सांगत आहे; मात्र या आक्रमणाचे पुरावे आणि झालेली हानी त्याच्या डोळ्यांसमोर आहे. ती पाकला बघायचीच नाही

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव यांचे ३० मार्च या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.

अचूक भविष्य वर्तवण्यासाठी ज्योतिषांनी नित्य साधना करणे आवश्यक ! – सौ. संदीप कौर मुंजाल, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

उपासना (साधना) करणार्‍या ज्योतिषांच्या भाकितांमध्ये जी अचूकता असते, ती अचूकता पुस्तकी पंडित असलेल्या ज्योतिषांच्या भाकितात नसते. उपासना (साधना) करणार्‍या ज्योतिषांची भाकिते मात्र तंतोतंत खरी झालेली आढळून येतात, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF