समाज सुसंस्कारित व्हावा !
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स लावल्याच्या प्रकरणी पुणे येथील देवीप्रसाद शेट्टी या उपाहारगृह मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ व्यवसायाची विक्री वाढावी; म्हणून तरुण पिढीला व्यसन लावणार्यांची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे यातून अधोरेखित होते.