४ वर्षांतून एकदा होणारी हिंदूंचे जागतिक व्यासपीठ असलेली ‘द वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ यंदा थायलंडमध्ये !

२४-२६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन !
हिंदु महामेळ्याला उपस्थित रहाण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

योगी आदित्यनाथ यांच्या ६ वर्षांच्या कार्यकाळात उत्तरप्रदेश पोलिसांच्या चकमकीत १९० गुन्हेगार ठार !

आमच्या सरकारने गुन्हेगारांप्रती शून्य संवेदनशीलतेचे धोरण राबवत मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२३ या ६ वर्षांच्या कालावधीत १९० गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांनी महंत यति नरसिंहानंद यांना लक्ष्मणपुरी येथे जाण्यापासून रोखले !

डासना पीठाचे महंत यति नरसिंहानंद यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी लक्ष्मणपुरी येथे जाण्यापासून रोखल्याची माहिती पुष्कल द्विवेदी यांनी ‘एक्स’वरून दिली.

मुख्यमंत्री योगी यांच्या ‘सिंध’ वरील टिप्पणीने पाकचा जळफळाट !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  सिंध प्रांत परत घेण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर पाकने टीका केली आहे. ‘योगी यांची ही अत्यंत दायित्वशून्य टिप्पणी आहे’, अशा शब्दांत पाकने संताप व्यक्त केला.

श्रीरामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येते, तर पाकमधील सिंध का नाही ? – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आपण आपल्या वारशाचा आदर केला पाहिजे. आपल्या वारशातूनच आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती साधू शकतो. आपण कितीही आधुनिक झालो, तरी आपला वारसा आपल्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही.

जगात केवळ एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्रीमद्भागवताचा सार समजण्यासाठी विचार संकुचित असू नयेत. संकुचित विचार करणारे विराटतेचे दर्शन करू शकत नाहीत.

पुरेशा उपस्थितीअभावी उत्तरप्रदेशातील २४० मदरशांची मान्यता रहित !

धर्मनिरपेक्ष देशात सरकारी पैशांतून मुसलमानांना धार्मिक शिक्षण देणे, हा  देशातील बहुसंख्य हिंदूंवर अन्यायच ! आतापर्यंतची सर्व सरकारे केवळ मतांसाठी हिंदूंवर अन्याय करून मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत ! हे चित्र पालटणे आवश्यक !

रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांचे अत्याचार, यांनंतरही सनातन संपला नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले की, लोक त्यांचा मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात.

अयोध्येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी चालू आहेत ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प !

अयोध्येला केवळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित न करता ते हिंदु धर्माचे शिक्षण मिळणारे जागतिक स्तरावरील केंद्र व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !

धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे, हा गुन्हा असल्याचा कायदा करा !

उत्तरप्रदेशातील आमदार डॉ. राजेश्‍वर सिंह यांची केंद्रीय कायदामंत्री आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी