गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

संभाजीनगर येथील महिलेचा विनयभंग करणार्‍या साहाय्यक पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा !

शहर पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर शहरात ढुमे यांच्याविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावगुंडांचा नायनाट करू ! – नागपूरमधील रणरागिणींची पोलिसांना चेतावणी

‘पोलीस ठाण्याच्या इतक्या जवळ घडणारे गुन्हे न दिसणारे पालीस आंधळे आहेत का ? गावगुंडांवर कठोर कारवाई न करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करा !

पनवेल-रोहा बसमध्‍ये महिलेचा विनयभंग करणार्‍या वाहकावर गुन्‍हा नोंद !

पनवेल-रोहा या धावत्‍या बसमध्‍ये वाहकाने (कंडक्‍टरने) महिलेचा रात्रीच्‍या वेळी विनयभंग केला, तसेच तिच्‍या समवेत अश्‍लील कृत्‍यही केले.

अल्‍पवयीन मुलीचे छायाचित्र प्रसारित करण्‍याची धमकी देऊन धर्मांधाची शरीरसंबंधाची मागणी !

महिलांना त्रास देण्‍यामध्‍ये धर्मांध नेहमी पुढे असतात, यातून त्‍यांची वासनांध वृत्ती गेलेली नाही, हेच लक्षात येते. अशा वासनांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !

संभाजीनगर येथे रस्त्यावर लुटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ !

गेल्‍या काही दिवसांपासून शहरातील वाढती गुन्‍हेगारी चिंतेचा विषय बनत आहे. शहरात हत्‍या, महिला अत्‍याचार आणि मोटारसायकल चोरीच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत आहे.

दोन विवाह झालेल्‍या धर्मांधाकडून हिंदु तरुणीला फसवून तिच्‍याशी तिसरा विवाह !

आणखी किती घटना घडल्‍यावर सरकारी पातळीवर लव्‍ह जिहाद कायदा होणार आहे ?

महिलेची छेड काढणारे संभाजीनगरचे साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त निलंबित !

येथील शहर पोलीस दलात साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त असलेले विशाल ढुमे यांच्‍यावर एका महिलेचा विनयभंग केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. त्‍यानंतर नागरिकांकडून यावरून मोठ्या प्रमाणावर संताप व्‍यक्‍त केला जात होता.

रामगड (झारखंड) येथे अरमान खान याने विवाहित हिंदु महिलेची केली हत्या !

अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ञांनी व्यक्त केली चिंता !

नुसती चिंता व्यक्त करून काहीच उपयोग नाही. संयुक्त राष्ट्रांनी याविषयी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे, अन्यथा ‘संयुक्त राष्ट्रे केवळ बुजगावणे आहे’, हेच स्पष्ट होईल !