विनयभंग करणार्‍या आरोपीला रत्नागिरी न्यायालयात २४ घंट्यांत शिक्षा

येथील न्यायालयाने २४ घंट्यांच्या आत एका आरोपीला १ वर्षभर सश्रम कारावास आणि ३०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावातील एका महिलेचा घरात घसून गणेश अनंत घवाळी याने विनयभंग केला होता.

कल्याण येथे महिला गार्डचा दोघांकडून विनयभंग

मालगाडीवर कर्तव्यावर असणार्‍या महिला गार्डचा रात्री विनयभंग करण्यात आला. कल्याण आणि कसारा रेल्वे स्थानकाच्या मध्ये धावणार्‍या मालगाडीवर महिला गार्ड कर्तव्य बजावत होत्या.

मुलीला चॉकलेट देणार्‍या अल्पवयीन मुलाची नग्नावस्थेत गावभर धिंड काढणार्‍या दोघांना अटक

सिरसंगी गावातील शाळकरी मुलीला चॉकलेट दिल्याच्या कारणावरून मुलीचा चुलता रवींद्र बुडके (वय ३० वर्षे) आणि अक्षय रेंबळे यांनी २२ सप्टेंबरला १० वर्षांच्या मुलाची नग्नावस्थेत गावभर धिंड काढली. 

नागपूर येथे गणेशोत्सवासाठी आलेल्या परदेशी तरुणीचा विनयभंग करणार्‍या एका व्यक्तीला अटक !

शहरात गणेशोत्सव पहाण्यासाठी आलेल्या परदेशी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. जयशील परिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नाशिकमधील महाविद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग करून प्राध्यापकांची विद्यार्थिनीकडे आक्षेपार्ह मागणी

नाशिक येथील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राम कदम यांची महिला आयोगाकडे बिनशर्त क्षमायाचना

घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात ‘एखाद्या मुलीने विवाहास नकार दिल्यास तिला पळवून आणण्यास साहाय्य करू’ असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी राज्य महिला आयोगाकडे बिनशर्त क्षमा मागितली आहे.

छेड काढण्याचा प्रयत्न करणार्‍या टवाळखोराला युवतींनी स्वत:मधील दुर्गा, कालिकेचा अवतार दाखवून द्यावा ! – युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे

युवतींनी स्वत:मधील दुर्गा, कालिकेचा अवतार छेड काढण्याचा प्रयत्न करणार्‍या टवाळखोराला दाखवून द्यावा, असे आवाहन शिवसेना युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले.

कुतिन्हो यांनी पीडित युवतीला १० लक्ष रुपयांची हानीभरपाई देण्याच्या रणरागिणीच्या मागणीला महिला आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद

गोवा महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा तथा अधिवक्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी विनयभंगाची शिकार झालेल्या एका अल्पवयीन युवतीची वैयक्तिक माहिती उघड केल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने १२ जुलै या दिवशी गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अधिवक्त्या शुभलक्ष्मी नाईक यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.

विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

१६ वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या प्रशिक्षक कुलदीपसागर याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

रणरागिणीची महिला काँग्रेसच्या कुतिन्हो यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

गोवा महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा तथा अधिवक्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी विनयभंगाची शिकार झालेल्या एका अल्पवयीन युवतीची वैयक्तिक माहिती उघड केल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने १२ जुलै या दिवशी गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अधिवक्त्या शुभलक्ष्मी नाईक यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.


Multi Language |Offline reading | PDF