वारकर्यांच्या सेवेसाठी पिंपरी पालिकेकडून १२ पथके !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्यांना विविध सेवासुविधा पुरवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १२० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्यांना विविध सेवासुविधा पुरवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १२० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
आज आळंदी (पुणे) येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या निमित्ताने…
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने १० जून या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी ९ जूनपासून शहरात येत होते.
पंढरीची नित्य वारी, गळ्यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्या ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्मरण नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्णुता, सदाचार, शाकाहार, व्यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.
‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥
पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ॥
कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्या वाड्यातून ३१ मे या दिवशी प्रस्थान झालेल्या माऊलींच्या दोन्ही अश्वांचे ८ जून या दिवशी पुण्यात आगमन झाले आहे.
देहू येथून १० जून या दिवशी जगद़्गुरु संत तुकाराम महाराज आणि ११ जून या दिवशी आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
आळंदी शहरामध्ये केवळ वारकरी आणि अत्यावश्यक सुविधा देणारी वाहने यांनाना प्रवेश देण्यात येणार असून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर येथे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले.