रात्रीची झोप पूर्ण होणे महत्त्वाचे !

काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्‍हा सकाळी लवकर उठतात. मग रात्रीची झोप पूर्ण झाली नाही; म्‍हणून दुपारी जेवल्‍यावर झोपतात. असे कधीतरी झाले, तर शरिराला मोठासा फरक पडत नाही; परंतु नेहमी असेच चालू राहिले, तर ते शरिराच्‍या दृष्‍टीने हानीकारक असते.

कृतज्ञता

‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचे २०० भाग आज पूर्ण होत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांच्यामुळेच हे शक्य झाले. यासाठी मी सर्वांप्रती कृतज्ञ आहे.

कोरड्या खोकल्‍यावर घरगुती उपचार !

एक वाटी कोणत्‍याही खाद्यतेलामध्‍ये पाव चमचा ओवा आणि चिमूटभर हळद घालून हेे तेल एकदा गरम करावे. थंड झाल्‍यावर हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवावे. कोरडा खोकला येत असेल, तेव्‍हा १ चमचा तेल प्‍यावे.

एकाच खांद्यावर वजन किंवा पिशवी घेणे टाळावे !

शरिराच्या संरचनेत पालट झाल्यास त्याचा कटी (कंबर), गुडघा, टाच इत्यादी सांध्यांवर ताण येऊन त्यांचे दुखणे चालू होते. असे होऊ नये, यासाठी एकाच खांद्यावर वजन न घेता आलटून पालटून दोन्ही खांद्यावर थोडा थोडा वेळ वजन घ्यावे.’

पावसाळा चालू होण्यापूर्वी औषधी वनस्पतींच्या लागवडीची सिद्धता करा !

वनस्पतींचे औषधी उपयोग आणि लागवडीविषयी माहिती सनातनचे ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ आणि ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यांत दिली आहे. या ग्रंथांचा अभ्यास करावा.

तीव्र उन्हामुळे येणार्‍या थकव्यावर सरबत उपयुक्त

‘उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे पुष्कळ घाम येतो. शरिरातील पाणी आणि क्षार न्यून झाल्याने थकवा येतो. अशा वेळी लिंबू सरबत किंवा अन्य कोणतेही सरबत प्यावे. याने पाणी आणि क्षार यांची पूर्तता होऊन लगेच तरतरी येऊन आराम वाटतो.

अती मात्रेत जेवणे किंवा अती आग्रह करून वाढणे टाळावे !

अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. आजकाल लग्नसमारंभांचे दिवस असल्याने आवडीचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे घडू शकते. आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.

उन्हाळ्यामध्ये हलका व्यायाम करावा !

 ‘उन्हाळ्यामध्ये शरिराची शक्ती न्यून झालेली असते. या दिवसांमध्ये व्यायाम करायचा झाल्यास तो योगासने आणि प्राणायाम अशा स्वरूपाचा असावा. सवय नसतांना वजन उचलण्याचे व्यायाम किंवा ज्या व्यायामांनी लवकर दमायला होते, असे व्यायाम करणे टाळावे.’

रात्री वेळेत झोप येत नसल्यास दुपारची झोप टाळावी !

‘रात्री झोपायला गेल्यावर झोप न लागणे, ही समस्या अनेकांना असते. बहुतेक वेळा दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे रात्री वेळेत झोप येण्यासाठी दुपारची झोप टाळावी.’

नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार

‘पाव चमचा सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण अर्धी वाटी गरम पाण्यात मिसळून दिवसातून ३ – ४ वेळा प्यावे. हा उपचार ५ ते ७ दिवस करावा.