आतापर्यंत चुकीचे शिकलेले विसरा !

‘एकदा एक मुलगा एका गायन शिकवणार्‍या गुरुजींकडे गेला. त्‍याने गुरुजींना विचारले, ‘‘गुरुजी, मी किती दिवसांत चांगले गायन शिकू शकेन ?’’ गुरुजी म्‍हणाले, ‘‘आधीचे चुकीचे शिकलेले विसरायला जेवढे दिवस लागतील..

अती मात्रेत जेवण टाळा !

‘अती मात्रेत जेवल्‍याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. त्‍यामुळेच आरोग्‍य राखण्‍यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.’

चला ! सोप्‍या भाषेत आयुर्वेद शिकूया !

पोळी बनवण्‍यासारखे लहानसे काम असो किंवा १०० वर्षांचे आयुष्‍य असो, ‘संतुलन’ महत्त्वाचे ! एकदा का वात, पित्त आणि कफ समजले की, आयुर्वेद समजला ! आयुर्वेद एवढा सोपा आहे.

तापामध्‍ये काही वेळेला भूक खूप लागते. अशा वेळी ‘पचनशक्‍ती चांगली आहे’, असे समजावे का ?

‘काहींना ताप आलेला असतांनाही पुष्‍कळ भूक लागते. अशा वेळी ‘भूक चांगली लागली, म्‍हणजे आपला अग्‍नी (पचनशक्‍ती) चांगला आहे’, असे समजू नये. अग्‍नी मंद असतांनासुद्धा भूक लागू शकते. हे कसे, ते समजण्‍यासाठी एक व्‍यावहारिक उदाहरण पाहू…..

तापामध्‍ये दही का खाऊ नये ?

दह्यामध्‍ये प्रथिने जास्‍त असतात. रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्‍यासाठी प्रथिनांचे सेवन आवश्‍यक असते’, या अर्धसत्‍य ज्ञानामुळे कोरोनाच्‍या काळात ताप असतांना अनेकांना दही खाण्‍याचा सल्ला दिला गेला. या दह्यामुळे पचनशक्‍ती मंदावून फुप्‍फुसांमध्‍ये पाणी होऊन रुग्‍ण अत्‍यवस्‍थ झाल्‍याची अनेक उदाहरणे वैद्यांच्‍या लक्षात आली.

‘ताप असतांना हलका आहार घ्‍यावा’, असे का सांगतात ?

‘आपल्‍याला चूल पेटवायची असेल, तर आधी चुलीतील राख काढून चूल स्‍वच्‍छ करावी लागते. त्‍यानंतर आपण एखादा कागद ठेवून आगपेटीच्‍या काडीने तो पेटवतो. कागद लगेच पेट घेतो.

तापामध्‍ये औषधी पाणी

‘१ लिटर पाण्‍यात अर्धा चमचा सनातन मुस्‍ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळावे. हे उकळलेले पाणी गाळून थर्मासमध्‍ये भरून ठेवावे.

ताप आलेला असतांना काय खावे ?

पेज प्‍यायल्‍याने लगेच तरतरी येते. १ – २ वेळा पेज प्‍यायल्‍याने थकवा निघून जातो आणि ताप लवकर बरा होण्‍यास साहाय्‍य होते.

ताप आलेला असतांना पचायला जड असे पदार्थ खाणे टाळावे

‘सध्‍या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्‍ये शरिराची पचनशक्‍ती क्षीण झालेली असते. गव्‍हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्‍कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्‍या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्‍यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’

शरिरात प्रमाणाबाहेर वाढलेले पित्त बाहेर काढून टाकण्यासाठी सोपा उपाय – एरंडेल तेल पिणे

प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी चहाचा अर्धा चमचा एरंडेल तेल पिऊन वर अर्धी वाटी कोमट पाणी प्यावे. एरंडेलाचे अर्धा चमचा हे प्रमाण अत्यंत अल्प आहे.