व्यायाम कधी करू नये ?

‘ताप आलेला असतांना, तसेच ‘खाल्लेले अन्न पचलेले नाही. पोटात तसेच आहे’, असे वाटत असल्यास व्यायाम करू नये. इतर वेळी मात्र स्वतःच्या क्षमतेनुसार नियमित व्यायाम करावा.’

फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते का ?

फोडणीचे पोहे बनवतांना अत्यंत अल्प प्रमाणात तेल वापरले, तर पित्ताचा त्रास होत नाही. अत्यल्प तेल वापरूनही उत्तम चवीचे फोडणीचे पोहे बनवता येतात. ज्यांना हे येत नाही, त्यांनी ओळखीच्या सुगरणींकडून ते शिकून घेतले, तर घरातील पित्ताचे त्रास पुष्कळ न्यून होतील.          

आजपासून नियमित न्यूनतम ३० मिनिटे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा !

‘व्यायाम नियमित केला, तरच त्याचे लाभ दिसून येतात. ‘व्यायाम केला; मात्र त्याचा काही लाभ झाला नाही’, असे होतच नाही. ‘कोणतीही गोष्ट अंगवळणी पडण्यासाठी ती न्यूनतम २१ दिवस प्रतिदिन केली पाहिजे’, असे मानसशास्त्र सांगते.

‘पुरेसा आहार घेऊनसुद्धा गळून गेल्यासारखे किंवा शक्तीहीन झाल्यासारखे वाटणे’ यावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

पुरेसा आहार घेऊनसुद्धा काहींना असे होते. जठराग्नी (पचनशक्ती) मंद झाल्याचे हे लक्षण आहे. यावरील प्राथमिक उपचार इथे देत आहोत. हे प्राथमिक उपचार करून गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्णाचे औषधी उपयोग

येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

‘निवळ वाचनाला नव्हे, तर कृतीला महत्त्व आहे’, हे जाणून आयुर्वेद आचरणात आणा !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या आयुर्वेदासंबंधीच्या चौकटींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्तंभातील चौकटींचे अर्धशतक आज पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने . . .

‘पचन चांगले असणे’, हे केवळ शरिराच्याच नव्हे, तर मनाच्या आरोग्यासाठीही आवश्यक !

‘माझ्या एका वैद्यमित्राने  सांगितलेला एक प्रसंग त्याच्याच शब्दांत येथे देत आहे – वैद्य मेघराज माधव पराडकर

नेहमी चहा पिणे आरोग्याला हानीकारक असल्याने तो सोडा !

बर्‍याच जणांना ही सवय मोडणे कठीण जाते. अशांनी आरंभी चहाचे प्रमाण अर्धे करावे. पुढे दिवसाला २ वेळा चहा घेत असल्यास एकदाच घ्यावा. पुढे एक दिवसाआड चहा घ्यावा. ‘चहा न प्यायल्याने काही बिघडत नाही’, हे अंतर्मनाला उमजते, तेव्हा चहा आपोआप सुटतो.’

गुडघ्यांना मागच्या बाजूनेही तेल लावा !

सर्वसाधारणपणे गुडघेदुखीवर उपचार म्हणून गुडघ्यांना तेल लावा म्हटले की, बहुतेक जण केवळ गुडघ्याच्या पुढील बाजूला, म्हणजे गुडघ्याच्या वाटीलाच तेल लावतात.

व्रणावर (जखमेवर) आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘कोणत्याही कारणाने (उदा. खरचटणे, कापणे यांमुळे) व्रण (जखम) झाला, तर त्यावर तुळशीचा रस लावावा. तुळशीचा रस लावल्याने व्रणामध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता न्यून होते आणि व्रण लवकर भरून येतो.