कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या ताकदीचे उदाहरण ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माझी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले

संभाजीनगर येथे लसीकरण प्रमाणपत्र पडताळणीविनाच मॉलमध्ये प्रवेश, पंपांवर इंधन देणे चालूच !

समाजाला वेळीच शिस्त न लावल्याचा परिणाम !

कोरोनाची लस न घेतल्यास पेट्रोल, गॅस अन् स्वस्त धान्य मिळणार नाही ! – संभाजीनगर येथील जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनानेही आता कठोर धोरण अवलंबले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी शिवसेनेच्या वतीने श्री महालक्ष्मीदेवीला साकडे !

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसेनेच्या वतीने १२ नोव्हेंबर या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीला साकडे घालून अभिषेक करण्यात आला.

गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवासी यांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका ! – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही चालू केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडून सनातनचे आपत्काळाविषयीचे दोन ग्रंथ भेट !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने दीपावलीनिमित्त सनातनचे शुभेच्छापत्र, तसेच सनातनचे आपत्काळावरील दोन ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

पुढील काही वर्षे कोरोनाची चाचणी अनिवार्य करावी लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सध्या राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १ सहस्र ३०० मेट्रिक टन इतकी आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यास दीड वर्ष लागेल.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन नवाब मलिक यांची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशीची मागणी !

‘कॉर्डेलिय क्रूझ’ वरील कारवाईच्या प्रकरणी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची २६ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली.

न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

न्यायदान प्रक्रियेच्या विलंबात सर्वसामान्य माणूस पिचला जातो. न्यायालयात चकरा मारून त्याचे आयुष्य संपते आणि न्यायालयीन व्ययही परवडत नाही. त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे चालू होणार !

कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून चालू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. चित्रपटगृहे चालू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.