भाजीसाठी पत्नीने ३० रुपये मागितले म्हणून पतीकडून तोंडी तलाक

अशा घटनांच्या वेळी देशातील महिला मानवाधिकार संघटना कुठे बेपत्ता होतात ? इस्लामसाठी चित्रपटांत काम करणे सोडणार्‍या अभिनेत्री झाहिरा वसीम यांची लगेच बाजू घेणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी हे तोंडी तलाकची झळ सोसाव्या लागणार्‍या मुसलमान महिलांविषयी चकार शब्दही काढत नाहीत !

नव्या तोंडी तलाकविरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती

केंद्रीय मंत्रीमंडळाने पुन्हा एकदा नव्या तोंडी तलाकविरोधी  विधेयकाला संमती दिली. यापूर्वीच्या मोदी सरकारने हे विधेयक लोकसभेत संमत केेले होते; मात्र ते राज्यसभेत संमत होऊ शकले नाही.

दूरभाषवरून दिलेला तलाक अवैध ! – न्यायालय

दूरभाषवरून दिलेला तलाक वैध नाही, असा निर्णय दादर दंडाधिकारी न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीत दिला आहे.

सत्ता आल्यास तोंडी तलाकविरोधी कायदा रहित करणार ! – काँग्रेस

महिलांवरील अत्याचारांपेक्षा मुसलमानांच्या मतांसाठी प्रयत्न करणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप आतातरी महिलांना समजेल का ?

विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा २ जानेवारीपर्यंत स्थगित

तोंडी तलाकचे लोकसभेत संमत झालेले विधेयक राज्यसभेत ३१ डिसेंबरला मांडण्यात येणार होते; मात्र काँग्रेससह विरोधी पक्षांनी घातलेलेल्या गदारोळामुळे सभागृह २ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्याने हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले नाही.

(म्हणे) ‘मुसलमान तलाकच्या संदर्भात कायदा नाही, तर कुराण मानतात !’ – आझम खान

जे मुसलमान आहेत, ते कुराण मानतात. तलाकची पूर्ण प्रक्रिया कुराणामध्ये दिली आहे आणि ती त्यांना ठाऊक आहे. या प्रक्रियेव्यतिरिक्त अन्य कोणताही कायदा मान्य नाही.

तीन तलाकसाठी कायदा बनू शकतो, मग राममंदिरासाठी का नाही ? – डॉ. तोगडिया

राममंदिराच्या प्रश्‍नावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना केवळ वातावरणनिर्मितीत स्वारस्य आहे. मंदिराच्या उभारणीत त्यांना मुळीच रस नाही.

तोंडी तलाकविरोधी विधेयक आणणार्‍या भाजप सरकारने राममंदिरासाठी कायदा करण्याचे धाडस दाखवावे ! – शिवसेनेची लोकसभेत मागणी

नवी देहली – तोंडी तलाकच्या विरोधात विधेयक आणणार्‍या भाजप सरकारने अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी कायदा करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी शिवसेनेने लोकसभेत केली.

लोकसभेमध्ये तोंडी तलाक विधेयक संमत

२७ डिसेंबरला लोकसभेमध्ये तोंडी तलाक विधेयक २४५ विरुद्ध ११ मतांनी संमत करण्यात आले. मतदानाआधीच काँग्रेससहित काही इतर विरोधी पक्षांनी सभात्याग करत विरोध दर्शवला. काँग्रेसच्या सभात्यागानंतर २५६ खासदारांनी मतदान केले.

लोकसभेत तलाकविरोधी विधेयक सादर

भाजप सरकारने लोकसभेत तलाकविरोधी विधेयक १७ डिसेंबर या दिवशी सादर केले. यापूर्वी हे विधेयक संमत करून घेण्यास सरकारला अपयश आले होते. त्यामुळे सरकारने याविषयीचा अध्यादेश लागू केला होता.


Multi Language |Offline reading | PDF