विशेष न्यायालय स्थापन करण्याचा कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आदेश !

पत्रकार गौरी लंकेश आणि लेखक एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या खटल्यांची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटक उच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणीच्या वेळी चालू झाला अश्‍लील व्हिडिओ !

‘हॅकर्स’कडून सायबर आक्रमण !
ऑनलाईन सुनावणी स्थगित

अनैतिक संबंधांच्या संशयावरून इंदापूर (पुणे) येथे तरुणाचे अपहरण करून हत्या !

जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली….

बकर्‍यांचा बळी देण्यावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार !

हिंदूंच्या परंपरांचा अनादर करण्यात धन्यता मानणार्‍या या स्वयंसेवी संघटनेने ईदच्या वेळी बकर्‍यांच्या कुर्बानीला कधी विरोध केला आहे का ?

देहली उच्च न्यायालयाने समान नागरी कायद्यावरील सुनावणी थांबवली !

‘भारतीय कायदा आयोग आधीच यावर काम करत आहे. त्यामुळे आम्ही संसदेला यासाठी वेगळा कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाही’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

फाशीच्या शिक्षेतून कतारमधील भारतियांना वाचवण्यासाठी भारताचे प्रयत्न !

‘काही वर्षांपासून भारताचे माजी नौदल अधिकारी हे कतारच्या करागृहात आहेत. त्यांना अलीकडेच कतारने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

खोटे किंवा सूड उगवण्यासाठी बलात्कारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पीडितेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय

बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले.

सनातन धर्माविरुद्ध परिषदा घेणार्‍यांना चपराक देणारा चेन्नई उच्च न्यायालयाचा निवाडा !

द्रविडी विचारसरणीविषयीच्या परिषदेला अनुमती मागण्याविषयीची याचिका उच्च न्यायालयाकडून असंमत

मंदिरातही पहाटे आरती होत असल्याने त्यामुळे गोंगाट होत नाही का ? – उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

मंदिरांतील आरतीमुळे ध्वनीप्रदूषण केले जात असेल, तर त्यावर कारवाई होऊ शकते. अनेक प्रकरणांत पोलीस कारवाई करतातही; मात्र ज्या तत्परतेने मंदिरांवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई होते, त्या तत्परतेने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई होत नाही, हेच सत्य आहे.

पुणे पोलीस आरोपींना समन्स आणि वॉरंट बजावण्याची कार्यवाही प्रभावीपणे करत नाहीत !

न्यायाधिशांना खंत व्यक्त करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! आतातरी पोलीस प्रशासन यावर विचार करून कर्तव्यनिष्ठ पोलीस सिद्ध करण्याकडे लक्ष देईल का ?