बारामुल्ला येथे आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १२ जणांना अटक

या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

भारतातील आतंकवादाचे प्रकार आणि त्यांवरील उपाययोजना !

भारताला आतंकवादाचा धोका अजूनही कायम असल्याने सतत सतर्क रहाणे आवश्यक !…

फेसबूकचा वैचारिक आतंकवाद !

भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांची गोपनीयता यांपेक्षा फेसबूक मोठे नाही. आवश्यकता भासल्यास कठोर शिक्षा करून त्यांना वठणीवर आणावे, ही भारतियांची केंद्र सरकारकडून अपेक्षा !

खलिस्तानी आतंकवाद : चीनचे छुपे युद्ध !

खलिस्तानी आतंकवादाच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान यांना भारतात अस्थिरता निर्माण करायची आहे.

अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारे सुरक्षा साहाय्य बंदच रहाणार !

अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.

पाकमधूनच तालिबानला संचालित केले जात असल्याने पाकनेच शांततेसाठी प्रयत्न करावेत ! – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी

राष्ट्रपती गनी यांनी पुढे म्हटले की, तालिबानवर पाकचाच पूर्ण प्रभाव आहे. पाकनेच तालिबानसाठी संघटित प्रणाली विकसित केली आहे. तालिबानचे निर्णय घेणार्‍या सर्व संस्था पाकमध्येच आहेत. त्यांना पाक सरकारचे समर्थन आहे.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

खानमोह भागात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलाने २ आतंकवादी ठार केले. त्यांच्याकडून २ पिस्तूल, १ हँड ग्रेनेड आणि ३ यू.बी.जी.एल्. (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) जप्त करण्यात आले.

जागतिक आतंकवादाचे आव्हान आणि भारत !

‘चीन हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू असून दुसर्‍या क्रमांकाचा शत्रू पाकिस्तान आहे. अफगाणिस्तान हे आतंकवादाचे माहेरघर आहे. त्यामुळे तेथूनही काही आतंकवादी भारतात प्रवेश करतात.

अनंतनाग येथे ३ आतंकवादी ठार

काश्मीरच्या अनंतनागच्या कोकोरनाग येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले.

काबुल (अफगाणिस्तान) येथील शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ५० जण ठार

सय्यद-उल्-शुहादा हायस्कूलजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ५० जण ठार झाले असून १०० हून अधिक घायाळ झाले आहेत. अद्यापपर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक शाळकरी मुला-मुलींचा समावेश आहे.