लेबनॉनमधील ख्रिस्ती महिला भारतातील मंदिरात बनली पुजारी !

लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. येथील ख्रिस्तींची लोकसंख्या ३२ टक्के आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला  तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात पुजारी बनली आहे.

अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या जीर्णोद्धार कामांचा शुभारंभ !

महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या जीर्णोद्धाराच्या विविध कामांचा शुभारंभ भाजपचे आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी..

क्रिकेटपटू रिंकू सिंह यांनी बांधले कुलदेवीचे मंदिर !

सिंह यांच्या कुटुंबाची कुलदेवता श्री चौदेरेदेवी आहे. इंडियन क्रिकेट लीग अर्थात् ‘आय.पी.एल्.’ आणि भारतीय क्रिकेट संघात खेळतांना चांगली कामगिरी व्हावी, यासाठी त्यांनी कुलदेवीकडे आशीर्वाद मागितले होते.

पुणे येथील जेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले !

खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा बंद असल्याने जेजुरीत येणार्‍या भाविकांची संख्या घटली होती. त्यामुळे जेजुरीच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. आता खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले झाल्याने दसर्‍यानंतर भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची षष्ठीला ‘मोहिनीरूपिणी माता’ रूपातील पूजा !

त्रिभुवनाला मोहित करणारी, शृंगारनायिका, सर्व आभूषणांनी आणि शृंगारवेषांनी युक्त, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणारी अशी मोहिनी रूपाचे दर्शन घडवणारी ही महापूजा होय. ही पूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.

श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा बांधण्यात आली होती.

अयोध्येतील हनुमानगढी मंदिराच्या साधूची गळा चिरून हत्या !

उत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्या किंवा आत्महत्या या भूमीच्या किंवा संपत्तीच्या वादातून होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याच कारणावरून अचानक साधूंच्या हत्यांची शृंखला कशी चालू झाली ? यामागील षड्यंत्र पोलीस शोधून काढतील का ?

श्री क्षेत्र जेजुरी गडावरील श्री खंडोबा मंदिराच्या गाभार्‍यातून भाविकांना दर्शन घेऊ द्यावे !

श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबाच्या गडावर देवाचे नवरात्र (घटस्थापना) चालू आहे. ग्रामस्थ, तसेच भाविक यांना मुख्य देवाच्या गाभार्‍यामध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी अनुमती नाही.

भगवा ध्वज लावलेल्या दुकानांमध्येच भक्तांनी जावे ! – विहिंप

मंगळुरू (कर्नाटक) येथील श्री मंगलादेवी मंदिर परिसरात हिंदु व्यापार्‍यांनाच दुकाने लावण्याची अनुमती देण्याचे प्रकरण

जम्मूतील श्री रणबीरेश्‍वर मंदिराचा काही भाग कोसळला !

सुरक्षादलाचे सैनिक घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी बचावकार्य चालू केले आहे.