गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले जातात, तसेच नाताळ आणि ३१ डिसेंबरलाही या आदेशांचे पालन व्हावे ! – पतित पावन संघटना

रात्री बारानंतर सर्व प्रकारचे आवाज बंद करावेत; मात्र असे झाले नाही, तर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करू, अशी चेतावणी ‘पतित पावन संघटने’कडून देण्यात आली आहे.

बलात्काराच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने मुलींना दिलेल्या सल्ल्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी !

माननीय सर्वोच्च न्यायालयाने यासह तरुण पिढीत नैतिक मूल्यांचे संवर्धन होण्यासाठीही समाजाचे दिशादर्शन करावे, असे जनतेला वाटते !

केवळ आसाममधीलच नव्हे, तर देशातील घुसखोरांची समस्या कशी सोडवणार ?

नागरिकत्व कायद्यातील कलम ‘६ अ’च्या वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न !

अपात्र ठरल्यासही शिवसेनेच्या आमदारांना विधान परिषदेची निवडणूक लढवता येणार ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर. विधानसभा अध्यक्ष

‘‘विधानसभेचा सदस्य म्हणून अपात्र झालेली व्यक्ती विधान परिषदेची निवडणूक लढू शकते; मात्र तिच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा नोंद नसावा किंवा वयाची ३० वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.’’ यावरून त्यांनी ‘शिवसेनेचे आमदार अपात्र ठरले, तरी त्यांना विधान परिषदेचे सदस्य होता येईल’.

रशियामध्ये ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी !

रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशात ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी घातली. रशियाच्या कायदा मंत्रालयाने बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने संमती दिली. न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी बंद दाराआड केली.

Mhadei Water Dispute : म्हादई प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची दाट शक्यता !

या सुनावणीसाठी गोवा सरकारने पूर्ण सिद्धता केली असून महाधिवक्ता देवीदास पांगम यांच्या देखरेखीखाली १० अधिवक्त्यांचे पथक देहली येथे गेले आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून ३ सहस्र २६९ दुकाने आणि आस्थापने यांची पडताळणी !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारी १७६ दुकाने आणि आस्थापने यांवर कारवाई करण्यात आली.

पाकिस्तानी कलाकारांवर भारतात कायमची बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

पाकमधील बहुतांश कलाकार हे भारतद्वेष्टे आणि धर्मांध आहेत. अनेक उदाहरणांतून ते समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून अशा कलाकारांनी भारतीय कलाक्षेत्रात काम करू नये, अशीच अनेक भारतियांची राष्ट्रभावना आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने याकडेही लक्ष घालावे’, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे !

Mhadei Water Dispute : म्हादई प्रकरणातील खटले गोवा जिंकणार ! – मुख्यमंत्र्यांचा विश्वास

ज्या पद्धतीने खटले प्रविष्ट झाले आहेत, त्यावरून गोवा हे खटले जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हादई प्रकरणी आम्ही गंभीर आणि भक्कम आहोत’, असेही ते म्हणाले.

सानपाडा येथे मुदत संपूनही दुकानांवर मराठीत पाट्या न लावणार्‍यांवर कारवाई करा !

महाराष्ट्रात मराठीसाठी संवेदनशील न रहाणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीयच होत !