सनातन संस्‍थेच्‍या वतीने आयोजित बिंदूदाबन शिबिराचा सोलापूर येथील साधकांनी घेतला लाभ !

पुढे येणार्‍या भीषण आपत्‍काळात रुग्‍णांना होणार्‍या वेदना न्‍यून होण्‍यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्‍यक आहे. यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने सोलापूर येथे ३ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते.

सोलापूर येथे ‘आय लव्‍ह पाकिस्‍तान’ लिहिलेल्‍या फुग्‍यांची विक्री करणारे कह्यात !

इदगाह मैदान येथे नमाजपठणासाठी आलेल्‍या एका व्‍यक्‍तीचे फुगेवाल्‍याकडे लक्ष गेले. त्‍या वेळी त्‍याला फुग्‍यांवर आक्षेपार्ह लिखाण असलेले फुगे आढळून आले. त्‍यानंतर त्‍याने त्‍वरित पोलिसांना त्‍याविषयी माहिती दिली.

तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन !

मंदिर विश्‍वस्‍त समितीने केवळ मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गाभार्‍यात प्रवेशाला अनुमती दिली होती; मात्र बी.आर्.एस्. पक्षाच्‍या वतीने हा शासकीय दौरा असल्‍याचा दावा करण्‍यात आला.

गोरक्षकांमुळे वैराग (सोलापूर) येथे ४३ गोवंशियांना कत्तलीपासून जीवदान !

सगळा गोवंश अहिंसा गोशाळेत उतरवण्‍यात आला. ही कारवाई यशस्‍वी करण्‍यासाठी वैराग पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, तसेच सुधीर भाऊ बहिरवाडे, हृषिकेश कामथे, अक्षय कांचन, राहुल कदम, अखिल भारत कृषी गोसेवा संघ सोलापूरचे शहर संघटक प्रसाद झेंडगे, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे धाराशिव प्रमुख रोहित बागल, तुळजापूरचे गोरक्षक अर्जुन देशमुख आदींचे सहकार्य लाभले.

पंढरपूर येथे ५ सहस्रांहून अधिक क्षमता असलेल्‍या बसस्‍थानकाची उभारणी !

श्री विठ्ठलाच्‍या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्‍या पहाता मोठे बसस्‍थानक बांधण्‍याचा निर्णय ३ वर्षांपूर्वी राज्‍यशासनाने घेतला होता. त्‍यासाठी २३ कोटी रुपये व्‍यय करण्‍यात आले आहेत. हे बसस्‍थानक २३ जूनपासून प्रवाशांसाठी खुले करण्‍यात येणार आहे.

आषाढी वारी मार्गावरील खासगी रुग्‍णालये चालू ठेवण्‍याच्‍या आरोग्‍यमंत्र्यांच्‍या सूचना !

वारकर्‍यांना तात्‍काळ आरोग्‍यविषयक सुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागाने ‘आरोग्‍याची वारी, पंढरीच्‍या दारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पालखी मार्गावर आवश्‍यक त्‍या आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.

सोलापूर येथील गोरक्षकांनी वाचवले ७ गोवंशियांचे प्राण !

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या गोरक्षकांनी १६ जून या दिवशी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी भाग्यनगर रस्ता येथे थांबून पोलिसांच्या साहाय्याने गोवंशीय असलेले वाहन पकडले.

पुणे येथे सव्‍वासहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्‍ट !

४७ गुन्‍ह्यांमध्‍ये दीड सहस्र किलो गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आले होते. न्‍यायालयीन प्रक्रियेनंतर २९ गुन्‍ह्यांतील गांजा आणि चरस नष्‍ट करण्‍याची अनुमती मिळाली.

सोलापूर विमानसेवेसाठी अडसर ठरणारी सिद्धेश्‍वर साखर कारखान्‍याची चिमणी पाडली ! 

सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिमणी पाडण्‍याचे आदेश दिल्‍यानंतर सोलापूर महानगरपालिकेने कार्यवाही चालू केली होती. चिमणी पाडल्‍यानंतर शहराची नागरी विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी सोलापूरवासियांमधून जोर धरू लागली आहे.

आषाढी यात्रेसाठी २१ जूनपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्‍यात येणार !

आषाढी एकादशीचा सोहळा २९ जून या दिवशी होणार आहे. त्‍यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्‍ये २१ जूनपासून पाणी सोडण्‍यात येणार आहे, तर २९ जून या दिवशी बंद करण्‍यात येणार आहे