सोलापूर जिल्‍हा परिषदेमध्‍ये पदमान्‍यतेसाठी शिक्षणाधिकारी घेतात ८ लाख रुपये !

शिक्षण विभाग पुणे उपसंचालक कार्यालय आणि सोलापूर जिल्‍हापरिषद शिक्षणाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचार चालू आहे. चौकशी समिती नेमून येथील शिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करणार का ?

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने अक्‍कलकोटसह ५ ठिकाणी हिंदूसंघटन मेळावे उत्‍साहात साजरे !

सध्‍या हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवून त्‍यांचे धर्मांतर केले जात आहे. त्‍यांच्‍यावर अत्‍याचार केले जात आहेत. हे थांबवण्‍यासाठी हिंदु मुली आणि महिला यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी होणे आवश्‍यक आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्‍फ’चा काळा कायदा रहित करण्‍यात यावा, अशी मागणी सोलापूर, लातूर, बीड आणि तुळजापूर (जिल्‍हा सोलापूर) येथे झालेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनां’त करण्‍यात आली.

राज्यातील १० जिल्ह्यांत २ सहस्र ८५२ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने भरपावसात उघड्यावर अंत्यविधी !

जालना जिल्ह्यात ९७१ ग्रामपंचायती आहेत, यांपैकी ६९५ गावांमध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर २७० गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी आणि दफनभूमी नाही. उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात.

स्‍टुडिओमध्‍ये गेलेल्‍या हिंदु मुलीचे कपडे उतरवून शरिराला स्‍पर्श करणारा धर्मांध पोलिसांच्‍या कह्यात !

हिंदूंनो, स्‍वसंरक्षण प्रशिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व जाणा !
हिंदूंनो, धर्मांध व्‍यावसायिकांची मानसिकता लक्षात घ्‍या !

गोहत्‍या थांबवण्‍यासाठी सोलापूर येथे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्‍हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करू नयेत, या मागण्‍यांसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला.

श्री स्‍वामी समर्थ अन्‍नछत्र मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा उत्‍सव मोठ्या उत्‍साहात संपन्‍न !

नादब्रह्म, पुणे यांचे ढोल पथक, अमोलराजे भोसले यांचा लेझीम संघ, केरळ येथील ढोल पथक, हरियाणा येथील श्री हनुमान देखावा आणि कोल्‍हापूर येथील हलगी पथक यांच्‍या सहभागाने हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

हिंदु राष्‍ट्र सेनेकडून के. चंद्रशेखर राव यांच्‍या फलकावर शाईफेक करत निषेध !

छत्रपती संभाजीनगर येथे बी.आर्.एस्. पक्षाचा पदाधिकारी मौलाना अब्‍दुल याने लुटारू औरंगजेबाचे उदात्तीकरण करत ‘औरंगजेब आमचा आदर्श आहे’,असे संतापजनक विधान केले आहे.

आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न !

गतवर्षीच्या माघी यात्रेच्या तुलनेत हे उत्पन्न ५७ लाख रुपयांनी अधिक आहे, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

यापुढे बडव्‍यांची अपकीर्ती करण्‍याचा प्रयत्न केल्‍यास त्‍याच भाषेत उत्तर देऊ !

बडवे कुटुंबियांनी पंढरपूरच्‍या श्री विठ्ठलाची मागील सहस्रो वर्षे अविरत सेवा केली आहे. त्‍यामुळे त्‍यांचा अवमान थांबवा, असे आवाहन नाशिक येथील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी केले आहे.