पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये आग

येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये ३ फेब्रुवारी या दिवशी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना लोकवस्तीजवळ घडली; मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही.

कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !

कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्‍न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्‍न !

सोलापूर जिल्ह्यातील बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी रुपयांचा निधी

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांत झालेल्या अतीवृष्टीमुळे सिंमेंटच्या बंधार्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्‍यांचे बांध वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या.

सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी ‘तांडव’ वेब सिरीजचे पोस्टर जाळून व्यक्त केला संताप

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात सोलापूर येथे हिंदु संघटनांच्या वतीने ‘तांडव’ वेब सिरीजचे आणि अभिनेता सैफ अली खानचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यात ११ केंद्रांवर कोविड लसीकरणास प्रारंभ 

कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास १६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यात ११ केंद्रांवर नियोजनबद्ध पद्धतीने प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० सहस्र १८४ आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना लस दिली जाणार आहे.

सोलापूर येथे नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्‍वर यात्रेस प्रारंभ

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेस १२ जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात तैलाभिषेकाने प्रारंभ करण्यात आला. प्रशासनाच्या आदेशानुसार मोजक्याच मानकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्‍वर मंदिराच्या परिसरात जमावबंदीचा आदेश

यात्राकाळात केवळ पासधारक भाविकांनाच धार्मिक विधीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल. लोकप्रतिनिधी आणि अतीमहनीय व्यक्ती यांनाही यात्राकाळात प्रवेश देण्यात येणार नाही. ग्रामीण भागातून यात्रेसाठी भाविकांनी शहरात येऊ नये यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस यांंच्या संयुक्त पथकांद्वारे शहराभोवती नाकाबंदी करण्यात येणार आहे

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

सोलापूर येथील शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त

येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या ‘डीबी’ (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथकाने १२ वर्षांच्या शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त केली. ही मुले शहरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होती.

सोलापूर येथे नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन करणारा फलक !

शास्त्रीनगर भागातील धर्मप्रेमी युवकांनी पाश्‍चात्त्य परंपरा मोडीत काढून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा निर्धार केला. त्यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन केले.