सोलापूर रेल्वेस्थानकात बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू करावे !

अशी मागणी का करावी लागते ? रेल्वे प्रशासन यासंदर्भात स्वतःहून कृती का करत नाही ?

अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यावरून माकपच्या आमदाराची आमदारकी रहित !

अशा प्रकारची फसवणूक करणार्‍यांना कारागृहातच टाकणे आवश्यक !

पुणे येथे अधिक परतावा देण्याचे आमीष दाखवून ३०० कोटी रुपयांची फसवणूक !

अधिक चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ‘अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट’ या खासगी आस्थापनाचे सेल्वकुमार नडार यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रशासकीय उधळपट्टी थांबवण्यासाठी कर्मचारी संघटनांनी संघटित कृती करणे अपरिहार्य !

आज नोकरीत जे ७० सहस्रांहून अधिक वेतन घेतात, त्यांनी त्यागाची सिद्धता दर्शवली पाहिजे. ‘आमचे हक्क सुरक्षित ठेवा आणि तरीही नोकरभरती करा’, ‘कंत्राटी कर्मचारी नेमू नका’, ‘सर्वांना निवृत्तीवेतन द्या’, असा कोरडा पाठिंबा देण्यात अर्थ नाही. तुम्ही या मुलांसाठी त्याग करणार का ? हा खरा प्रश्न आहे.

इक्वेडोरमध्ये ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : १३ जणांचा मृत्यू

इक्वेडोर या दक्षिण अमेरिकन देशात १९ मार्च या दिवशी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होण्यापासून सरकारने रोखावे ! – ज्ञानी हरप्रीत सिंह, श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख)

राजकीय हितासाठी पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यापासून सरकारने रोखले पाहिजे. सरकारने लोकशाहीमध्ये रहाणार्‍यांना आणि स्वतःचे म्हणणे मांडणार्‍यांना अवैधरित्या कह्यात घेण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे; कारण पंजाबने यापूर्वी पुष्कळ सोसले आहे, असे आवाहन श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी केले आहे.

पुणे येथे कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ‘पोस्टर’ लावणार्‍या तिघांवर गुन्हा नोंद !

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली असतांना अशाप्रकारे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे, हे सरळसरळ कायदा अन् सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्यासारखे आहे !

बलात्काराच्या प्रकरणी तिघा धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा !

असे कृत्य करणार्‍यांवर जरब बसवायची असेल, तर आरोपींना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !

काणकोण (गोवा) समुद्रकिनार्‍यावर रात्री संगीतामुळे होणारे ध्वनीप्रदूषण थांबवावे ! – नागरिकांची पोलिसांत तक्रार

नागरिकांना कर्कश संगीताचा त्रास होतो; तर मग पोलीस आणि प्रशासन यांना ते ऐकूही येत नाही का ? पोलीस आणि प्रशासन यांचे हात कुणी बांधलेले आहेत कि त्यांचे हात यात गुंतले आहेत ?

योगऋषी रामदेवबाबा यांनी हिंदु तरुण-तरुणींसाठी आयोजित केला संन्यास महोत्सव !

योगऋषी रामदेवबाबा यांनी येत्या २२ मार्च ते ३० मार्च (श्रीरामनवमी) या कालावधीत संन्यास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात ज्यांना संन्यासी व्हायचे आहे, ते अर्ज करू शकणार आहेत.