अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

कर्नाटकमधील सरकारी शाळेत ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनात अंडे खाण्यास भाग पाडले !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदुविरोधी घटना सतत घडू लागल्या आहेत. काँग्रेसला निवडून दिल्यास काय होते ?, हे हिंदूंना आतातरी कळेल का ?

शाळा विलीनीकरणाचे ‘मध्यप्रदेश मॉडेल’ देशभरात लागू करणार ! – नीती आयोग

देशभरातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच अल्प शिक्षकसंख्येची समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाने महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. आयोगाने सर्व राज्यांना उद्देशून म्हटले आहे की, मध्यप्रदेशचे ‘एक शाळा-एक परिसर’ हे ‘मॉडेल’ देशभरात लागू केले जाऊ शकते.

आपण आधुनिक झाल्याने मुलांना फ्रेंच, इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही ! – अभिनेत्री ईशा तलवार

असे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो !

जाजपूर (ओडिशा) येथील शाळेत उठाबशा काढण्याची शिक्षा केल्यामुळे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

जाजपूर येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गातील एका मुलाला शिक्षा म्हणून उठाबशा काढण्यास सांगण्यात आले होते. उठाबशा काढतांना हा मुलगा बेशुद्ध पडला.

नालासोपारा येथे रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलींवर केली जात आहे बळजोरी !

असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने सर्वत्रच्या महिलांना विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे !

आगीच्‍या संदर्भात सूचना

आगीच्‍या संभाव्‍य धोक्‍याविषयी जागरूक आणि सावधान रहाणे, हा अग्‍नीशमनाचे ज्ञान आत्‍मसात करण्‍याचा उद्देश आहे. पुढील लहान-सहान गोष्‍टी आचरणात आणल्‍यास कित्‍येक अपघात टाळले जाऊ शकतात.

अग्‍नीशमनाच्‍या पद्धती

आगीला इंधनापासून वंचित केले किंवा इंधनपुरवठा बंद केला, तर आग त्‍वरित विझते. या पद्धतीला ‘स्‍टार्व्‍हिंग’ असे म्‍हणतात, उदा. गॅसची शेगडी विझवतांना आपण गॅसचा पुरवठा बंद करतो. शेगडी इंधन न मिळाल्‍याने विझते.

प्रथमोपचार : काळाची गरज !

सध्‍याच्‍या धकाधकी आणि गतीमान जीवनात कोणती परिस्‍थिती कुणावर केव्‍हा होईल ? याची शाश्‍वती देता येत नाही. किरकोळ दुखापत असो वा जीवघेणी परिस्‍थिती, त्‍या प्रसंगात सतर्क राहून योग्‍य कृती करणे अत्‍यंत आवश्‍यक असते.

आग बघितल्‍यावर काय करावे ?

आग लहान आणि आवाक्‍यात असतांना विझवणे, हा अग्‍नीशमनाचा सर्वोत्तम उपाय आहे. असे असले, तरी आगीमुळे अपघात हे घडतच असतात. आग म्‍हटली की, आपल्‍याला आठवते ते अग्‍नीशमन दल आणि घंटा वाजवत येणारा आगीचा बंब !