कर्नाटक विश्‍वविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या कक्षात जादूटोणा !

विश्‍वविद्यालये किंवा शिक्षणसंस्था या स्वतःला ‘पुरोगामी’ किंवा ‘आधुनिक विचारांचे माहेरघर’ समजतात. त्यामुळे विश्‍वविद्यालयातील एका प्राध्यापकाच्या कक्षात अशी घटना घडणे पुरो(अधो)गाम्यांसाठी लज्जास्पदच म्हणावी लागेल !

रत्नागिरी जिल्ह्यातील २७९ गावे ‘हर घर जल’ गाव म्हणून घोषित

‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ‘हर घर जल योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ३२ सहस्र ६९ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे.

Indian Navy Day 2023 : नौसेना दिनानिमित्त वाहतुक व्यवस्थेत बदल

जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व तारकर्ली येथे भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त वाहतूक व्यवस्थेतील झालेले पालट देत आहोत.

स्वायत्त महाविद्यालयांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले !

कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले जाईपर्यंत कुणीच कसे काही पाहिले नाही ?

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक !

खंडाळा तालुका धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी १६ दिवसांपासून लोणंद पंचायतीसमोर उपोषण चालू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १ डिसेंबर या दिवशी धनगर समाजाने आक्रमक होत पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खंडाळा येथे रस्ताबंद आंदोलन केले.

संपादकीय : फालतू फेमिनिझम् !

नीना गुप्ता यांनी ‘फेमिनिझम्’ला फालतू म्हटले, तर त्यामुळे स्त्रीमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबण्याचे काही कारण नाही. स्त्रीला कशापासून मुक्तता मिळवून द्यायची आहे ? ‘स्त्रियांचे हित आणि त्यांचा उत्कर्ष कशात आहे ? आणि हा उत्कर्ष अशा चळवळींमुळे साध्य होणार का ?’, याचा विचार करण्याची वेळी आली आहे.

खोटे किंवा सूड उगवण्यासाठी बलात्कारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पीडितेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय

बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले.

रशियामध्ये ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी !

रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशात ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी घातली. रशियाच्या कायदा मंत्रालयाने बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने संमती दिली. न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी बंद दाराआड केली.

Bomb Threat In Bengaluru Schools : इस्लाम स्वीकारा किंवा मरायला सिद्ध व्हा !

काँग्रेस सरकारने या संदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. हा खोडसाळपणा आहे कि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून पुढे मोठा घातपात करण्याचा प्रयत्न आहे ?, हे जनतेच्या समोर आले पाहिजे !

इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटीशकालीन जुना रेल्वे पुलाचा मध्यभाग ढासळला !

ब्रिटीशकालीन पुलाच्या वापराची मुदत संपूनही त्याचा वापर अजूनही का केला जातो ? असा जनताद्रोही कारभार करणार्‍या संबंधितांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !