शबरीमाला मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी : व्यवस्था कोलमडली

यावर्षी मोठ्या संख्येने भाविक भगवान अय्यप्पा यांच्या शबरीमला मंदिराला भेट देत आहेत. मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आहे. यात्रेकरूंनी मूलभूत सुविधा आणि सुरक्षा यांचा अभाव असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

अमरावती येथे गुन्हेगारांना शस्त्रविक्री करणार्‍या टोळीला अटक !

शस्त्रे बाळगून समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

शरणार्थींच्या पुनर्वसनासाठी ब्रिटनकडून रवांडाला १ सहस्र कोटी रुपये !

इतरत्र आश्रय शोधणार्‍या शरणार्थींना पूर्व आफ्रिकेतील देश असलेल्या रवांडामध्ये स्थलांतरित करण्याच्या कराराचा भाग म्हणून या वर्षी ब्रिटनने रवांडाला आणखी १० कोटी पॉऊंड (साधारण १ सहस्र कोटी रुपये) दिले आहेत.

आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका ! – अभिनेत्री मालविका अविनाश

लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्‍या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका’, असे आवाहन अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या मालविका अविनाश यांनी केले.

Racism : ब्रिटनमध्ये ४० टक्के भारतीय डॉक्टरांना वर्णद्वेषी वागणुकीला सामोरे जावे लागते ! – संशोधनाचा निष्कर्ष

या संदर्भात भारत सरकारने ब्रिटनला आणि तेथे सध्या भारतीय वंशाचे पंतप्रधान असणारे ऋषी सुनक यांना या घटना थांबवण्यासाठी सांगणे अपेक्षित आहे !

जलद गती विशेष न्यायालयांमध्ये ‘पोक्सो’ची २ लाख ४३ सहस्र प्रकरणे प्रलंबित

जलद गती न्यायालयांतील केवळ एका कायद्याच्या संदर्भात इतकी प्रकरणे प्रलंबित असतील, तर अन्य प्रकरणांच्या प्रलंबित खटल्यांची कल्पनाच करता येत नाही. जलद गती न्यायालयांची ही स्थिती असेल, तर भारतात तत्परतेने न्याय मिळणे  कठीण आहे, हेच लक्षात येते !

देहू (जिल्हा पुणे) येथील गायरान भूमीसाठी वारकरी लढा देतील ! – ह.भ.प. माणिक महाराज मोरे, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज

देहू येथील गायरान भूमी ही देवस्थानाच्या धार्मिक कार्यासाठी वापरली जावी, यासाठी येथील वारकरी उपोषणाला बसले होते. ‘तीर्थक्षेत्र वाचवा आणि गायरान वाचवा’, अशी हाक देऊन हे उपोषण केले होते. मागील २ मासांपासून आम्ही गाव बंद आंदोलन केले, तसेच प्रभात फेरी काढून जनजागृतीही केली.

शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध !

आळंदी – ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी शासनाने एक परिपत्रक काढले आहे. यानुसार ‘पंतप्रधान पोषण आहार योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, महानुभव संप्रदाय, जैन संप्रदाय, तसेच विविध आध्यात्मिक संप्रदायांचे भाविक दु:खी झाले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला भाजप … Read more

‘लिव्ह-इन’ संबंधांमुळे संस्कृती नष्ट होत असल्याने त्यावर बंदी घालणारा कायदा करा !  

भारतातही ‘लिव्ह-इन’ संबंधांसारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. कुटुंबांमध्ये वाद होत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये  फटाक्यांच्या गोदामाला आग : ७ जणांचा होरपळून मृत्यू !

पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर आणखी काही कामगार त्यात अडकल्याचे बोलले जात आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना चालू होते.