मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास होणार !
येथील बहुसंख्य नागरिक हे बाहेरील राज्यातून आलेले आहेत. त्यांचा विकास होऊन त्यांना घरे मिळू शकतात; परंतु कित्येक मराठी माणसांना घरांच्या प्रचंड किमतींमुळे मुंबईबाहेर जावे लागत आहे, हे वास्तव आहे !
येथील बहुसंख्य नागरिक हे बाहेरील राज्यातून आलेले आहेत. त्यांचा विकास होऊन त्यांना घरे मिळू शकतात; परंतु कित्येक मराठी माणसांना घरांच्या प्रचंड किमतींमुळे मुंबईबाहेर जावे लागत आहे, हे वास्तव आहे !
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आरंभ करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्ता, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पॉडटॅक्सी, कांजूरमार्ग कारशेडसह इतर कारशेडचे भूमीपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून अधिक लाभ कमावण्याच्या दृष्टीने होत असलेली कर्मचार्यांची पिळवणूक रोखण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप हवा !
तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याचे आढळून अल्यानंतर कर्नाटकाच्या धर्मादाय विभागाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये नंदिनी तुपाचा वापर अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे.
घटस्फोटासाठी न्यायालयात गेलेल्या दांपत्याला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठाने गविसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मध्यस्थीने समस्या सोडवून एकत्र जीवन जगण्याचा सल्ला दिला.
मंदिरात वितरीत करण्यात येणार्या प्रसादाला विशेष दर्जा देण्यात यावा. प्रसाद करण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करावीत, तसेच देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये वितरीत करण्यात येणार्या प्रसादाची उच्चस्तरीय पडताळणी करावी, तसेच प्रसादाला विशेष दर्जा देऊन तो बनविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करावीत
बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय पडताळणीच्या काळात आधुनिक वैद्यांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला. विशेष तपास पथकाने या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात ‘राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ जशीच्या तशी लागू केली आहे. १ मार्च २०२४ पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २० सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनाकडून याविषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना असे का म्हणावे लागले ?, यावर देशभरात चर्चा झाली पाहिजे. देशातील जनतेचीही अशीच मानसिकता असल्याचे दिसून येते. याला कोण उत्तरदायी आहे आणि का ?, हेही समोर आले पाहिजे !
आपली मुले काय करत आहेत, याकडे पालकांचे लक्ष आहे का ? ‘त्यांच्यावर योग्य संस्कार करत आहोत का ?’, याचा विचार पालकांनी करणे आवश्यक आहे. मुलांना साधनेचे संस्कार केल्यास अशा घटना घडणार नाहीत !