विधानसभा अध्यक्षविरोधी याचिकेवर ११ जुलैला निर्णय होणार !

शिवसेनेच्या वतीने नियुक्त केलेल्या प्रतोदना अवैध ठरवत एकनाथ शिंदे यांच्या गटाने नियुक्त केलेल्या प्रतोदच्या ‘व्हीप’ला मान्यता देण्याच्या नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका प्रविष्ट करून आव्हान देण्यात आले आहे

आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्या सहकाऱ्याला जामीन !

र्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेले सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. सईद खान हे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे सहकारी आहेत.

शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभु यांची नियुक्ती रहित !

शिवसेनेच्या १६ आमदारांना शिंदे गटाकडून ‘व्हीप’ बजावण्यात आला आहे. ‘व्हीप’ न पाळल्यास आमदारकी रहित करण्याची प्रक्रिया शिंदे गट करू शकतो.

शिवसेनेसमवेत बंडखोरी करणारे कधीही निवडून आले नाहीत ! – अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवू ! – गुलाबराव पाटील, आमदार

शिवसेना रसातळाला जात असतांना तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेना संपत असेल, तर ती वाचवण्याचे दायित्व आमचे आहे. असे प्रतिपादन एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर देतांना केले.

‘हिंदुत्व’ हेच आमचे धोरण : हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही ! – नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही जे केले, त्यामागे हिंदुत्वाचा विचार आहे. ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यांच्याकडेच आम्ही गेलो आहोत. हिंदुत्व हेच आमचे धोरण असून पदासाठी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही !

एकनाथ शिंदे आणि माझ्यात कधीही कुरघोडी राजकारण दिसणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहेत. ते कुशल संघटक असून जनतेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध आहेत. अनेकदा पदे मिळाल्यावर व्यक्ती माणुसकी विसरतो; परंतु एकनाथ शिंदे हा माणुसकी असलेला नेता आहे.

एकनाथ शिंदे सरकारने विश्‍वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी जिंकला !

प्रस्तावाच्या बाजूने भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्या १६४ आमदारांनी, तर विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या ९९ आमदारांनी मतदान केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ५ आमदारांनी मतदान केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी एकही झाड न तोडता एक वर्षात आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडचे २५ टक्के काम झाले आहे. आम्ही लोकांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. विलंबामुळे या कामाचा व्यय १०-१५ सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. एका वर्षात एकही झाड न तोडता आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच !

अवघ्या काही घंट्यांपूर्वी शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपांखाली आढळराव पाटील यांचे उपनेतेपद काढून घेण्यात आले होते