आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाकडून पोलीस आयुक्तांना नोटीस !

‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांना सहभागी करून घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेच्या खासदारांची मागणी

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली.

ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर आरतीसाठी प्रवेश नाकारल्याने हिंदू आणि शिवसेना यांच्याकडून निषेध !

येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते. याचा निषेध म्हणून वर्ष १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते.

महाराष्ट्रात विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रेचा निर्णय अध्यक्षांनी घेऊ नये ! – सर्वोच्च न्यायालय

विधानसभेतील आमदारांच्या अपात्रतेविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश ११ जुलै या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या अध्यक्षांना दिले.

कोल्हापुरातील शिवसेना कार्यकारिणी विसर्जित !

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणीत पालट करण्यात आला आहे, तसेच जुनी कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपूर्वी नवी कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे सुमारे ४० हून अधिक नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी आले.

ठाणे येथील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी

ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश आहे.

‘औरंगाबाद’ नामांतराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण !

महाविकास आघाडी सरकारने ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांमध्ये प्रचंड अप्रसन्नता आहे. काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह अल्पसंख्यांक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यागपत्रे दिली आहेत.

पक्षाच्या घटनेत हिंदुत्वाचा उल्लेख नसल्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजप आणि शिवसेना यांना हिणवले !

काँग्रेसने जन्माला घातलेली तथाकथित धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव यांचा त्याग करून हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यास हिंदुत्वनिष्ठ पक्षांना हिणवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची तोंडे आपोआप बंद होतील !

लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदावरून खासदार भावना गवळी यांना हटवले !

भावना गवळी यांना प्रतोदपदावरून काढून त्यांच्या जागी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.