श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ने जागवले हिंदूतेज !  

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने १५ ऑगस्‍टला ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढण्‍यात आली. या यात्रेत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्‍थिती होती, तर सहस्रो धारकरी, हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्ती आणि भगव्‍या ध्‍वज यांना हार अर्पण करून प्रेरणा मंत्राने ही पदयात्रा प्रारंभ झाली.

हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या साहाय्‍याने रोखली अयोग्‍य राष्‍ट्रध्‍वजांची विक्री !

रुईकर वसाहत येथील पोस्‍ट कार्यालयात असलेल्‍या राष्‍ट्रध्‍वजांमध्‍ये असलेले अशोकचक्र हे गोल नसून अंडाकृती असल्‍याचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या लक्षात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांसह संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा असायला हवा !

तिरंग्याचा मान राखून आम्ही ‘भारताचा झेंडा पूर्ववत् ‘भगवा’ करण्यात यावा, तसेच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे’, अशी मागणी करत आहोत.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या अटकेसाठी पिंपरी येथे पुरोगामी संघटनांचा मोर्चा

पुढील १० दिवसांत पू. भिडेगुरुजी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद न झाल्‍यास राज्‍यव्‍यापी आंदोलन करण्‍याची चेतावणी दिली. विविध संघटनांच्‍या शिष्‍टमंडळांनी मागण्‍यांचे हे निवेदन पोलीस आयुक्‍तांना दिले.

राष्‍ट्र सुयोग्‍य स्‍थितीत रहाण्‍यासाठीही उपवास आवश्‍यक ! – पू. भिडेगुरुजी

१५ ऑगस्‍टला संपूर्ण देशात-गावात भगवे झेंडे घेऊन हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होण्‍यासाठी ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढली पाहिजे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

पुणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक अध्‍यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून कारवाई करण्‍यात यावी, अशी तक्रार डेक्‍कन पोलीस ठाण्‍यामध्‍ये महात्‍मा गांधी यांचे पणतूू तुषार गांधी यांनी केली आहे.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांची अपकीर्ती न थांबल्‍यास राज्‍यव्‍यापी आंदोलन करू ! – सकल हिंदु समाज, कोल्‍हापूर

अमरावती येथील सभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका धारकर्‍याला ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्‍तकातील उतारा वाचण्‍यास सांगितला होता. काँग्रेस सरकारच्‍या काळात प्रकाशित झालेले हे पुस्‍तक आहे. असे असतांना विधानसभेत आणि राज्‍यभर काँग्रेस, पुरोगामी, डावे अकारण पू. भिडेगुरुजी यांच्‍यावर खोटे आरोप करून त्‍यांची अपकीर्ती करत आहेत, आंदोलन करत आहेत.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात पनवेल येथे गुन्‍हा नोंद

यांनी गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्‍मा जोतिबा फुले आणि पेरीयार नाईकर यांच्‍याविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याचा आरोप करून अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

पू. भिडेगुरुजींच्‍या समर्थनार्थ जळगावातील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना एकवटल्‍या !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या वक्‍तव्‍याच्‍या विरोधात घडणार्‍या घटनांच्‍या निषेधार्थ जळगाव जिल्‍ह्यातील समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देऊन या गैरप्रकाराचा तीव्र निषेध केला.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ भोर येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने सन्‍मान मोर्चा !

मूठभर लोकच गुरुजींच्‍या विरोधात असून सकल हिंदु समाज पू. भिडेगुरुजी यांच्‍या पाठीशी आहे, हे सांगण्‍यासाठी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने शिवतीर्थ, चौपाटी, भोर येथे पू. भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सन्‍मान मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते.