यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देऊ ! – सागर आमले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

प्रशासनाने वेळीच अशा गैरकृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाह श्री. सागर आमले यांनी दिली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर !

शिवतीर्थावर (पोवई नाक्‍यावर) पू. गुरुजींच्‍या समर्थनार्थ आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी शेकडो हिंदूंच्‍या उपस्‍थितीत पू. गुरुजींच्‍या प्रतिमेला दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. नंतर जिल्‍हा प्रशासनाला निषेध निवेदन देण्‍यात आले.

ठाणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

नौपाडा पोलीस ठाणे गुन्‍हा नोंदवून घेत नाही, तोपर्यंत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते येथे ठाण मांडून बसले होते. काही काळ पोलिसांसमवेत चर्चा करून पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याविषयी ठाणे येथे गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

सातारा जिल्‍हा काँग्रेस कमिटीकडून रस्‍ता बंद  आंदोलनाद्वारे सामान्‍य जनतेला वेठीस धरण्‍याचा प्रयत्न !

काँग्रेसच्‍या पदाधिकार्‍यांकडून ऋषितुल्‍य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या विषयी एकेरी भाषा वापरून अपमानास्‍पद घोषणाबाजी केली.

अमरावती येथे पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

यवतमाळ येथे कार्यक्रमस्थळी पुरोगामी संघटनांकडून घोषणाबाजी !

कोल्हापूर येथे काँग्रेसवाल्यांचे पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात आंदोलन !

अमरावती येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी म. गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ २९ जुलैला ‘कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी’च्या वतीने काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

विधानसभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या अटकेची विरोधकांची मागणी !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. या वेळी विरोधकांतील काहींनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांना फासावर चढवण्याची मागणी केली.

गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांना सतत विशेष सुरक्षाव्यवस्था द्यावी !

हिंदु सकल समाजाची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी -मणीपूर आणि देशभरामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात ठोस कारवाई करा !  

दीप अमावास्येच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दीपपूजन !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ, मारुति चौक येथे दीप अमावास्येच्या निमित्ताने दीपपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना विशेष सुरक्षा व्‍यवस्‍था पुरवा ! – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे निवेदन

तरी समाजकंटकांकडून अनुचित कृत्‍य घडू नये आणि त्‍यातून कायदा-सुव्‍यवस्‍था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यांसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना महाराष्‍ट्रात अन् राज्‍याबाहेर विशेष सुरक्षा व्‍यवस्‍था पुरवावी, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने गडहिंग्‍लज येथे प्रांत कार्यालयात देण्‍यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार विष्‍णु बुट्टे यांनी स्‍वीकारले.