स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या संमेलनासाठी राजस्थान विश्‍वविद्यालयाकडून जागा देण्यास नकार !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हा स्वा. सावरकरद्वेष आहे. त्यामुळे तेथील विश्‍वविद्यालयाने असा निर्णय दिल्यास आश्‍चर्य ते काय ? काँग्रेस स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे स्वा. सावरकर यांचा विरोध करत असतांनाही सावकर यांचे महत्त्व जराही न्यून झाले नाही, उलट ते वाढले आहे, हे काँग्रेसच्या लक्षात येईल तो सुदिन !

राजस्थान विश्‍वविद्यालय ने वीर सावरकर पर आयोजित सम्मेलन के लिए जगह नहीं दी !

कांग्रेस सरकार का वीर सावरकर द्वेष !

राजस्थानच्या काँग्रेस सरकारचा सावरकरद्वेष जाणा !

राजस्थान विश्‍वविद्यालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या संमेलनासाठी जागा देण्यास नकार दिला आहे. ‘इंडियन कौन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्च’कडून (आय.सी.एच्.आर्.कडून) संमेलनासाठी जागा मागण्यात आली होती. यापूर्वी सरकारने पाठ्यपुस्तकातील धड्यातूनही सावरकरांच्या नावापूर्वीचा ‘वीर’ शब्द काढला होता.

(म्हणे) ‘गांधी हत्येच्या कटात सहभागी सावरकर पुराव्याअभावी सुटले !’ – माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष सोडले होते. असे असतांना काँग्रेसवाल्यांचा न्यायप्रणालीवर विश्‍वास नाही, असाच याचा अर्थ होतो ! अनेक वर्षे एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीकडून न्यायव्यवस्थेचा अशा प्रकारे अनादर होणे, हे लोकशाहीचे दुर्दैवच !

खरा संसार म्हणजे देशाचा संसार !

‘चार काड्या जमवून घरटी बांधणे आणि चूल-मूल राखणे यालाच जर संसार म्हणत असतील, तर असा संसार चिमण्या आणि कावळेही करतात. आपण आपली चार चूलबोळकी सोडून असा संसार करू की, ज्या योगे देशाच्या घराघरातून सोन्याचा धूर निघेल.’

हिंदूंच्या हृदयात स्थान पटकावणारे एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई !

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काय बोलावे ! जगात असा एकही गुण नाही, जो सावरकर यांच्यामध्ये नाही. त्यांनी ८३ वर्षे अखंडपणे हिंदुस्थानची हृदयापासून, मनापासून सेवा केली. आता आपल्या हातून देशसेवा घडणे अशक्य आहे म्हणून प्रायोपवेशन केले.