हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्या !

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

सीबीआयने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावरील सर्व आरोप त्वरित मागे घ्यावेत !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणाची दिशाहीनता न्यायालयासमोर मांडून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी अन्वेेषण यंत्रणांचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड केला.

रणझुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना जामीन संमत !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयकडून (केंद्रीय अन्वेषण विभाग) जाणीवपूर्वक गोवले गेलेले आणि अन्याय्य पद्धतीने अटक करण्यात आलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना  पुणे येथील विशेष न्यायालयाने ५ जुलैला जामीन संमत केला.

पन्हाळा येथील बार असोसिएशनमध्ये अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अन्याय्य अटकेविषयी अधिवक्त्यांचे प्रबोधन

येथील बार असोसिएशनमध्ये १ जुलैला हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांच्या अन्याय्य अटकेच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्त्यांना माहिती देण्यात आली.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा वाराणसीतील २०७ अधिवक्त्यांकडून निषेध

जनहितासाठी लढा देणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने मे २०१९ मध्ये अटक केली. अधिवक्ता पुनाळेकर यांच्या अटकेच्या विरोधात वाराणसी येथील धर्माभिमानी अधिवक्त्यांनी स्थानिक अधिवक्त्यांमध्ये जागृती केली आणि स्वाक्षरी मोहीम राबवली.

यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला नागरिकांचा स्वाक्षरीद्वारे उत्स्फूर्त पाठिंबा

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना त्वरित सन्मानाने मुक्त करावे, ही मागणी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनावर ५ जुलैला निकाल

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अटक केलेले अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनाचा (अर्जाची) निकाल ५ जुलै या दिवशी देण्यात येणार आहे.

भुसावळ येथे पोलिसांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाला अनुमती नाकारली

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अन्यायकारक अटकेच्या निषेधार्थ २३ जून या दिवशी भुसावळ येथील अष्टभुजादेवी मंदिरासमोर आंदोलन करण्यात येणार होते.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनावरील सुनावणी २५ जूनला होणार

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनाची (अर्जाची) सुनावणी २५ जून या दिवशी होणार आहे.

सार्वजनिक विश्‍वस्तव्यवस्था सुधारणा विधेयकातील अधिवक्ता पुनाळेकर यांचे नाव काढा ! – राष्ट्रवादी काँग्रेसची द्वेषपूर्ण मागणी

केवळ आरोप आहे म्हणून अधिवक्ता पुनाळेकर यांचे नाव विधेयकातून काढण्याची मागणी करणारे स्वपक्षात गुन्ह्यांचा आरोप असलेल्या अनेक आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करतील का ? ‘कोंबड झाकलं, तरी सूर्य उगवायचा रहात नाही’ या उक्तीप्रमाणे आता नाव काढले, तरी त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद होईलच !


Multi Language |Offline reading | PDF