सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना बांधली राखी !

भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या आर्. टी. नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना राखी बांधण्यात आली.

भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र ! – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी ससेनगर येथे व्यापारी-उद्योजक यांसाठी ‘हलाल जिहाद’ या विषयावर बैठक झाली.

वाई (जिल्हा सातारा) येथील पू. (श्रीमती) मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

मूळ पुणे येथील आणि सध्या वाई येथे रहाणार्‍या श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्या, हे आनंदवृत्त सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी सर्वांना दिले. उपस्थित सर्वांनीच या सोहळ्यात भावानंद अनुभवला.

वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद

परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली.

‘श्री सद्गुरुमहिमा’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील द्वितीय खंड प्रकाशित !

श्री. भांडकाकांनी लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ, म्हणजे त्यांच्या गुरूंप्रती असलेल्या भावाने ओथंबलेला अमृतघटच आहे !

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

सनातन पुनर्नवा चूर्ण

‘सनातन पुनर्नवा चूर्ण’ हे औषध आता उपलब्ध आहे. येथे ‘प्राथमिक उपचार’ सांगितले आहेत. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बुद्धीच्या स्तरावर केलेल्या शंकानिरसनामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली साधना करण्याचा दृढनिश्चय केलेले नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे !

नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४१ वर्षे) हे अभियंता असून महावितरण आस्थापनात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत असूनही गुरूंवरील श्रद्धा आणि साधनेची तळमळ यांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत.

दासबोध अभ्यास मंडळा’चे शाम साखरे यांच्या ८५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘चालविसी हाती धरोनिया’, या जीवनगौरव अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !

श्री. शाम साखरे सध्या नामजप आणि भक्ती करण्याकडेच अधिक भर देतात. कोणतीही सेवा निरपेक्षतेने केल्यास आपोआप त्याचे फळ मिळते, अशीच त्यांची श्रद्धा आहे. अभ्यासातून श्रद्धा वाढते.

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथील शाळेत ‘नैतिक शिक्षण’ विषयावर मार्गदर्शन !

सनातन संस्थेच्या वतीने देहलीच्या सैदुलाजाब येथील ‘लिटिल वंस पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा इयत्ता ३ री ते ५ वीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.