इतर संतांचे मार्गदर्शन तात्त्विक असणे, तर सनातनच्या संतांचे मार्गदर्शन कार्यकारणभाव आणि उपाय सांगणारे असणे 

सनातनच्या संतांचे लिखाण आणि मार्गदर्शन साधनेच्या स्तरावर नेमकेपणाने कोणती कृती का आणि कशी करावी, हे स्पष्ट करणारे असते. ते उपाय सांगणारे असते. यामुळेच आज सनातन संस्थेतील साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे.

गुरूंची प्रीती साधकांवर सर्वकाळ असतेच !

साधकांच्या मनात काही वेळा ‘गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे) माझ्याकडे लक्ष नाही, त्यांची इतर साधकांवर प्रीती आहे; पण माझ्यावर नाही’, अशासारखे नकारात्मक विचार येतात. अशा साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.

प्रत्येक कृती परिपूर्ण करणार्‍या, समाधानी वृत्तीच्या आणि इतरांचा विचार करणार्‍या बराकर (बंगाल) येथील श्रीमती केसरी देवी भुकानिया (वय ७८ वर्षे) !

आईला कोणत्याही वस्तूची आसक्ती नाही. दागदागिने, कपडे ज्या वस्तूविषयी सर्वसाधारण महिलांना आसक्ती असते, तसे तिचे कधीच नसते.

साधकांची साधना गतीने होण्यासाठी त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेची आवड निर्माण करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर !

दीपालीताईने सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यावर आनंद मिळू लागला

पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या कुंडलीच्या अभ्यासातून संतपदाविषयी लक्षात आलेल्या सूत्राप्रमाणे प्रत्यक्षातही घडणे

कु. दीपाली मतकर यांच्या कुंडलीचा अभ्यास केल्यावर, त्या वयाची ३३ वर्षे पूर्ण झाल्यावर लगेच संतपद प्राप्त करतील असे गुरुदेवांनीच आतून उत्तर दिले, त्याप्रमाणे २८.१०.२०२१ या दिवशी कु. दीपालीताई सनातनच्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

२१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात् १ मुलगा, ३ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

सांगली येथून गोवा येथे स्थलांतरित होतांना पू. सदाशिव परांजपेआजोबा (वय ७८ वर्षे) आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (वय ७३ वर्षे) यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांनी सांगली येथून गोवा येथे स्थलांतरित होतांना त्यांनी ‘अनुभवलेली गुरुकृपा इथे प्रस्तुत करीत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून समष्टी साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानवयातच समष्टी धर्मकार्याला प्रारंभ केला. त्यामुळे समष्टी सेवा करणारे हे आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे.

मिरज येथील सनातनच्या आश्रमातील साधकांचा आधारस्तंभ असलेले आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव असणारे पू. जयराम जोशी (पू. आबा) (वय ८३ वर्षे) !

पू. आबा परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच दिसत असल्याने ‘पू. आबा परात्पर गुरुदेवांचे एक रूप आहे’, असे साधकांना वाटते. पू. आबांशी बोलतांना ‘परात्पर गुरुदेवांशी बोलत आहोत’, असे साधकांना जाणवते.

आकाशतत्त्वाच्या (इंटरनेटच्या) माध्यमातून प्रभावीपणे अध्यात्मप्रसार करवून घेणारे महान परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधक आणि धर्मप्रेमी यांना घरोघरी प्रसार करण्याच्या स्थूल मार्गातून सूक्ष्म अशा आकाशतत्त्वाच्या माध्यमातून प्रसार करायला शिकवणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.