मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनुमती द्या, अन्यथा तुमचे नाटक बंद करा ! – महंत अनिकेतशास्त्री

महंत अनिकेतशास्त्री यांनी ‘मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनुमती द्या !’ अशी मागणी करत चेतावणी दिली की, भाईचार्‍याच्या नात्याने आम्हालाही मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनमुती द्या, अन्यथा तुमचे नाटक बंद करावे.

राजकीय नेते पैसे देऊन सभांसाठी गर्दी जमावतात ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

राजकीय पक्ष आणि संत यांच्यात हाच भेद आहे ! बहुतांश राजकीय पक्ष जनतेला पैसे, सुविधा आदींचे गाजर दाखवतात, तर हिंदूंचे साधू-संत जनतेला  शाश्‍वत आनंदाच्या अनुभूतीकडे मार्गक्रमण करण्यासाठी साधना सांगतात, हे जाणा !

धर्मस्थळाद्वारे पैसे कमावणे हे विनाशाचे लक्षण असल्याने सत्ताधार्‍यांना दुष्परिणाम भोगावे लागतील !

बारा ज्योतिर्लिंगांपैकी येथील महाकालेश्‍वर मंदिरात चालू असलेली सशुल्क दर्शन व्यवस्था बंद करण्याची मागणी संत आणि महंत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र लिहून ही व्यवस्था बंद करण्याची मागणी केली आहे.

देवळात प्रवेश नसतांना विठ्ठलाचे भक्त संत चोखामेळा अमर झाले !

आज संत चोखामेळा यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रेय देशपांडे यांचा देहत्‍याग !

शरणागत आणि कृतज्ञताभाव असणारे, तत्त्वनिष्‍ठ, तसेच भगवंताच्‍या अखंड अनुसंधानात असणारे सनातन संस्‍थेचे १६ वे संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी ७ मे या दिवशी सकाळी १०.१५ वाजता सनातनच्‍या आश्रमात देहत्‍याग केला.

लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र अक्कलकोट !

श्री क्षेत्र अक्कलकोट हे ठिकाण सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनित झालेले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून लाखो भक्तांच्या मनोकामना स्वामींच्या चरणी पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

बारामती (पुणे) येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

‘मोर्च्याच्या समारोपप्रसंगी प.पू. कालीचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला’, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी स्वतः तक्रार प्रविष्ट करून ही कारवाई केली आहे.

पालघर येथील बालयोगी पू. सदानंद महाराज यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव !

२७ एप्रिल या दिवशी एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र तुंगारेश्‍वर येथील आश्रमात जाऊन बालयोगी पू. सदानंद महाराज यांचे दर्शन घेतले.

इतिहासात प्रथमच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्‍वरहून १ दिवस आधी प्रस्थान होणार !

प्रतिवर्षी चतुर्दशीच्या दिवशी पालखीचे होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला, म्हणजेच २ जूनला होणार ! २८ जून या दिवशी पालखी पंढरपूरला पोचेल. ३ जुलै या दिवशी परतीचा प्रवास चालू होऊन २० जुलै या दिवशी पालखीचे त्र्यंबकेश्‍वर येथे आगमन होईल.

नागपूर येथे ८ सहस्र चौरस फूट जागेवर उभे रहाणार संत जगनाडे महाराज यांचे स्‍मारक !

नागपूर येथील जगनाडे चौक येथे ८ सहस्र चौरस फूट जागेवर संत जगनाडे महाराज यांच्‍या भव्‍य स्‍मारकाची निर्मिती करण्‍यात येणार आहे.