राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांचा देहत्याग !

सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणार्‍या येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणे (वय ९८ वर्षे) यांनी १६ जून या दिवशी रात्री ११ वाजता रहात्या घरी देहत्याग केला.

पैठण येथील संतपिठात १५० विद्यार्थी, १० प्राध्‍यापक; मात्र उपस्‍थित कुणीही नाही !

एका पहाणीत संतपिठाच्‍या वर्गात एकही विद्यार्थी दिसला ना प्राध्‍यापक ! संतपीठाचे समन्‍वयक डॉ. प्रवीण वक्‍ते यांनी प्राध्‍यापक प्रतिदिन येत असल्‍याचा दावा केला

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले ओजस्वी विचार !

देशाची प्रगती तर होत आहे; मात्र इंजिन बंद पडलेल्या विमानाप्रमाणे आपण भरकटलो आहोत. बौद्धिक क्षमता वाढली आहे; परंतु हृदय छोटे झाले आहे. भारतात ८० टक्के हिंदू आहेत; परंतु त्यांच्यातील किती हिंदूंमध्ये हिंदुत्व जिवंत आहे ?

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात एकत्र आलेली शक्ती हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात कृतीशील होईल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्राची संकल्पना ही आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन यांचे नाव आहे. हिंदू ‘चराचरात ब्रह्म आहे’, असे मानत असल्यामुळे त्याचा उपभोग घेण्याची हिंदूंची संस्कृती नाही. त्यामुळे भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, त्याद्वारे विश्वकल्याणाचे कार्य होईल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

श्री विठ्ठल नामाच्‍या जयघोषात संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्‍या पालख्‍यांचे पुणे शहरात आगमन !

पंढरपूरकडे निघालेल्‍या संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्‍या पालख्‍यांचे पुणे येथे १२ जून या दिवशी सायंकाळी आगमन झाले.

संत एकनाथ महाराजांची पालखी दादेगाव येथील गावकर्‍यांनी अडवली !

संत एकनाथ महाराज पालखी मार्गातील रस्‍त्‍याची दुरवस्‍था पहाता यंदा मार्गात काही प्रमाणात पालट करण्‍यात आले आहेत; मात्र प्रतिवर्षी ज्‍या गावातून ही पालखी जाते, त्‍या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्‍य नाही. त्‍यामुळेच पालखी अडवण्‍यात आल्‍याची माहिती मिळत आहे

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान !

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी वारी आणि वारकरी यांचा सांगितलेला महिमा !

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥
पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ॥

भारतातील इस्लाम सर्वांत सुरक्षित ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘इस्लाम खतरे में है’, अशी बांग ठोकणारे धर्मांध मुसलमान नेता, तसेच ‘भारतात मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, अशी आवई उठवणारे महाभाग यांना यावरून जाब विचारला पाहिजे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी संत आणि मान्यवर यांनी अर्पिलेली कृतज्ञतासुमने !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला अनेक संत, मान्यवर आणि हितचिंतक उपस्थित होते. त्यापैकी काहींनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत देत आहोत.