साधकांची साधना व्‍हावी, ही तळमळ असल्‍याने त्‍यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

१८ जानेवारी २०२३ या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची श्री. प्रकाश शिंदे यांनी घेतलेली भेट आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता यांविषयी पाहिले. आज त्‍यापुढील भाग पाहूया.               

उत्तम नियोजनकौशल्‍य असलेल्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. निकिता झरकर !

मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील स्‍वयंपाकघरात सेवा करण्‍याची संधी मिळाली होती. त्‍या वेळी कु. निकिता झरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

भावपूर्ण व्‍हायोलिन वादनातून श्रोत्‍यांना आनंद देणारे मुंबईतील प्रसिद्ध व्‍हायोलिन वादक पं. मिलिंद रायकर (वय ५८ वर्षे) !

क्षणचित्रे १. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संशोधन पाहून ‘मलाही संगीतातील नवीन प्रयोग करण्‍याविषयी सूत्रे सुचत आहेत’, असे पं. रायकर म्‍हणाले. ‘संगीत संशोधन आवडल्‍याने अशा प्रकारचे संशोधन वाढावे’, यासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍याशी परिचित कलाकारांना संपर्क करून त्‍यांना या संशोधनात सहभागी करण्‍याचा प्रयत्न केला. २. पं. रायकर यांनी त्‍यांच्‍या व्‍हायोलिन ठेवण्‍याच्‍या पेटीच्‍या आतल्‍या बाजूला त्‍यांच्‍या गुरूंचे छायाचित्र आणि त्‍यांच्‍या … Read more

साधकांची साधना व्‍हावी, ही तळमळ असल्‍याने त्‍यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

डोंबिवली, जिल्‍हा ठाणे येथील साधक श्री. प्रकाश शिंदे वर्ष १९८९ पासून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आहेत. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सत्‍संगातील आठवणी आणि मिळालेली शिकवण यांविषयीची त्‍यांनी दिलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरूंवरील श्रद्धेच्‍या बळावर कठीण प्रसंगांत सतर्क राहून कृती करणार्‍या पडेल, जिल्‍हा सिंधुदुर्ग येथील श्रीमती प्रज्ञा राजेंद्र जोशी (वय ४३ वर्षे) !

श्रीमती प्रज्ञा राजेंद्र जोशी (वय ४३ वर्षे) माध्‍यमिक शिक्षिका आहेत. त्‍या मितभाषी, साध्‍या, सरळमार्गी आणि उपजतच साधकत्‍व असलेल्‍या एक गुणी साधिका आहेत. त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

प्रेमभाव असल्‍याने सतत इतरांचा विचार करू शकणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !

श्रीमती भारती पालनताई पुष्‍कळ प्रेमळ आहेत. आम्‍ही ३ – ४ साधिका धान्‍य निवडण्‍याची सेवा चालू असते, तेथे ‘राईस रोटी’ (कुरकुरीत डोसे, अल्‍पाहाराचा एक प्रकार) निवडत असतो. तेव्‍हा ताई थोड्या थोड्या वेळाने मला विचारतात, ‘‘माई, तुमचे हात दुखत नाहीत ना ? दुखत असतील, तर मला सांगा हं. मी थोडे चाळते.’’

कोल्‍हापूर येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांना श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) यांची ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी झाल्‍याविषयी मिळालेली पूर्वसूचना

५.११.२०२२ या दिवशी रात्री मी निवासस्‍थानी जाण्‍यासाठी आश्रमाच्‍या स्‍वागतकक्षात गाडीच्‍या प्रतीक्षेत उभी होते. त्‍या वेळी तेथे आसंदीवर एक काकू (श्रीमती भारती पालनकाकू) बसल्‍या होत्‍या. त्‍यांच्‍या चेहेर्‍याकडे पाहून ‘त्‍या देवाच्‍या अनुसंधानात आहेत’, असे मला वाटले.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवर श्रद्धा असल्‍याने वडिलांच्‍या मृत्‍यूनंतर स्‍थिर रहाणार्‍या आणि साधनेमुळे सकारात्‍मक पालट अनुभवणार्‍या पुणे येथील कु. मधुरा मोहन चतुर्भुज (वय ३५ वर्षे)!

पौष कृष्‍ण दशमी (१७.१.२०२३) या दिवशी कु. मधुराचा ३५ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त मला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये आणि तिच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

हिंदूंनो, धर्मरक्षणासाठी सिद्ध व्‍हा ।

तीळगूळ घ्‍या अन् गोड गोड बोला ना । द्रष्‍ट्या संतांचे (टीप) बोलणे जरा शांतपणे ऐका ना ॥

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाचा नामजप करतांना शांत वाटणे आणि श्रीकृष्‍णाचा नामजप करतांना आनंद जाणवणे, यांमागील कारणमीमांसा

आधी त्रेतायुग झाले आणि नंतर द्वापरयुग झाले. त्रेतायुगात श्रीरामाचा अवतार झाला. त्‍याचा नामजप करतांना मला शांत वाटले. नंतरच्‍या द्वापरयुगात श्रीकृष्‍णाचा अवतार झाला. त्‍याचा नामजप करतांना आनंद वाटला.