रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघाल्यावर ओढवलेल्या कठीण परिस्थितीमध्ये साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !

‘सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्या अनंत आणि अपार अशा कृपेला मी शब्दांमध्ये कसे मांडू ? आपणच माझ्याकडून ही सेवा ‘कृतज्ञता’ म्हणून करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिला गुरुकृपेने सुचलेली कविता !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाढदिवसा निमित्ताने पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतारूपी काव्यसुमने येथे देत आहोत.

‘मनात नकारात्मक किंवा निराशेचे विचार आल्यावर त्यातून बाहेर कसे पडायचे ?’, यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

विचार करू नकोस. अनिष्ट शक्ती त्रास देत असतातच त्या मनात विकल्प आणतात. त्यामुळे नामजपादी उपायांकडेच लक्ष ठेव. विकल्प येतील, तेव्हा मनाला सूचना द्यायच्या आणि अधिक सत्रे करायची.

पुणे येथील साधिका सौ.अर्चना चांदोरकर यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

व्यवहारात व्यक्तीची पात्रता पाहून नोकरी देतात; परंतु परात्पर गुरुदेव सेवा देतांना त्या साधकाची योग्यता पाहून नाही, तर त्याला पात्र बनवण्यासाठी सेवा देतात.

यजमानांना त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे, त्याच दिवशी पू. संदीप आळशी यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर यजमानांचे त्रास दूर होणे

पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे यजमान संतांच्या समवेत नामजपाला बसू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यजमानांना होणारे त्रास दूर झाले.

सेवा करतांना सौ. गौरी कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले आणि सर्वांशी जवळीक साधणारे रामनाथी, गोवा येथील श्री. सुनील नाईक !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सुनील नाईक (वय ४२ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या पत्नी सौ. सुषमा नाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

गुरुकृपेने संत वडील लाभल्याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

माझा जन्म केवळ साधनेसाठीच झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी योग्य वेळी मला त्यांच्याजवळ घेऊन साधनेची योग्य दिशा दिली आहे; पण या सर्वांचे मुख्य कारण पू. आबांची साधना आहे !

चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे होळी सणाच्या निमित्ताने सौ. स्वाती शिंदे यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

सद्यस्थितीत लोक सणांमधील धार्मिक शास्त्र समजून न घेता स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागतात. परंतु त्याला आध्यात्मिक वळण नसल्यामुळे धर्माचरण न झाल्याने सणांचे पावित्र्य बिघडते. होळीच्या सणाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या !

चि. श्रीराम अभिषेक मुरुकटे (वय ३ मास) याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मी हनुमंताला प्रार्थना केली, ‘तुझ्या नावावरून बाळाचे नाव ठेवायचे आहे, तर तूच मला योग्य नाव सुचव.’ त्यावर हनुमंत म्हणाला, ‘माझे नाव ठेवण्यापेक्षा माझ्या प्रभूंचे, म्हणजे श्रीरामाचे नाव ठेवल्यास अधिक चांगले.